आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपूर्वी एका अमेरिकी हॅकरने संपूर्ण उत्तर कोरियाची इंटरनेट प्रणाली हॅक केली. या हॅकिंगला को पी4एक्स नावाने ओळखले गेले. या कम्युनिस्ट देशाने काही दिवसांपूर्वी केलेल्या सायबर हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकारी वेबसाइटसह ई-मेल सिस्टिमही जाम केली.
गेल्या दोन आठवड्यांत हॅकरने उत्तर कोरियातील अनेक अधिकृत वेबसाइटला लक्ष्य केले. यात उ. कोरियाची एअरलाइन एअर कोरियो आणि वृत्तसंस्था नेनाराचाही समावेश आहे. हा हल्ला ‘डिस्ट्रिब्यूटेड डिनायल ऑफ सर्व्हिस’ कोडच्या रूपात वारंवार केला गेला. यात इंटरनेट ट्राफिक बंद होते. काही तज्ज्ञांना शंका होती की हा सायबर हल्ला उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचा बदला घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी केला असावा. परंतु वायर्ड मॅग्झीनच्या मते ‘हे अशा अमेरिकी व्यक्तीचे काम असू शकते जो टी-शर्ट, पायजामा घालून सहजपणे या डिजिटली मागास देशाला आपले सावज करू शकतो.
इंट्रानेटच्या भरवशावर आहे देश, त्यामुळे उणिवा कळल्या
उ. काेरिया एकमेव असा देश आहे जो या आधुनिक युगातही इंट्रानेटच्या भरोशावर चालत आहे. येथे लोकांना केवळ सरकारी वेबसाइटचे अॅक्सेस आहेत. इंटरनेट नसल्याने ते जगाशी अपरिचित आहेत. सरकारच्या परवानगीशिवाय येथील लोक किंवा अधिकारी इंटरनेटचा वापर करू शकत नाहीत. केवळ मोजक्या अधिकाऱ्यांना वेब अॅक्सेस असल्याने हॅकर ‘पी4एक्स’ ला ऑपरेटिंग सिस्टमच्या उणिवा कळाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.