आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • North Korea’s Kim Jong Un Seen Hand In Hand With Daughter I Her 1st Public Appearance I Latest News And Update 

पहिल्यांदाच मुलीसोबत दिसले किम जोंग:मुलीला क्षेपणास्त्र चाचणी दाखविली, पत्नीही होती समवेत

प्योंगयांग11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि त्यांच्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किम जोंग यांच्या मुलीची ही पहिलीच सार्वजनिक उपस्थिती आहे. याआधी जगाने त्यांची मुलगी पाहिली नव्हती. त्यांच्या मुलीचे नाव माध्यमांमध्ये आले होते. पण प्रथमच तिचा तिच्या वडिलासोबतचा फोटो प्रथमच व्हायरल झाला आहे.

उत्तर कोरियाच्या KCNA वृत्तसंस्थेनुसार, किम यांनी या छायाचित्रात आपल्या मुलीचा हात पकडला आहे. पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातलेली त्यांची मुलगी आणि किम लष्करी सुविधेबाहेर उभे आहेत. दोन्ही एकत्र उभ्या असलेल्या लष्करी सुविधेतून शुक्रवारी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. यावेळी किमची पत्नी री सोल जूही त्यांच्यासोबत होती.

हा फोटो किम जोंग आणि त्यांच्या मुलीचा आहे. त्यांच्या मागे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) आहे. ज्याची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली.
हा फोटो किम जोंग आणि त्यांच्या मुलीचा आहे. त्यांच्या मागे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) आहे. ज्याची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली.
इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) लाँच करण्यापूर्वी किम जोंग यांनी क्षेपणास्त्राची पाहणी केली. यावेळी त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती.
इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) लाँच करण्यापूर्वी किम जोंग यांनी क्षेपणास्त्राची पाहणी केली. यावेळी त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती.
बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीवेळी किम जोंग मुलगी आणि पत्नी री सोल जूसोबत लष्करी केंद्रात उपस्थित होते.
बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीवेळी किम जोंग मुलगी आणि पत्नी री सोल जूसोबत लष्करी केंद्रात उपस्थित होते.

किम एक चांगला पिता आहे: माजी बास्केटबॉल स्टार डेनिस
उत्तर कोरियामध्ये परदेशी मीडियावर पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे इथल्या बातम्या फार कमी जगापर्यंत पोहोचतात. 2013 मध्ये ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'नुसार, माजी बास्केटबॉल स्टार डेनिस रॉडमनने सांगितले की किम जोंग उनला एक मुलगी होती. जिचे नाव त्यांनी जू ए ठेवले. डेनिस म्हणाला होता- मी किम जोंग आणि त्याची पत्नी री सोल जू यांच्यासोबत वेळ घालवला आहे. किम एक चांगला पिता आहे.

किमची पत्नी 2012 मध्ये होती गर्भवती : अहवाल
2012 मध्ये, किम जोंग उनची पत्नी री सोल जू गरोदर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये त्यांनी लांब कोट घातलेला होता. मीडियाने सांगितले की, गर्भवती असल्याचे त्यांनी लपविले होते. मात्र, किम आणि त्यांच्या पत्नीसह एकाही सरकारी अधिकाऱ्याने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.

दक्षिण कोरिया नॅशनल इंटेलिजेंस सर्व्हिस (NIS) नुसार, किम आणि री यांचे 2012 पूर्वी लग्न झाले होते. दोघांना तीन मुले आहेत.
दक्षिण कोरिया नॅशनल इंटेलिजेंस सर्व्हिस (NIS) नुसार, किम आणि री यांचे 2012 पूर्वी लग्न झाले होते. दोघांना तीन मुले आहेत.

2012 पर्यंत किमच्या लग्नाची कोणतीही बातमी नव्हती.
2012 पर्यंत, किम विवाहित आहे हे कोणालाही माहित नव्हते. जुलै 2012 पर्यंत, उत्तर कोरियाच्या मीडियाने किम जोंग आणि री सोल जू यांच्या लग्नाची घोषणा केली नाही. 2018 मध्ये, मीडियाने री सोल जू यांना प्रथमच प्रथम महिला म्हणून संबोधले.

बातम्या आणखी आहेत...