आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Not A Single Woman Attended The Taliban Education Ministers' Meeting, Previously 50% Of Women Were Present In The Same Hall

काबूल:तालिबानी शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीला एकही महिला हजर नाही, यापूर्वी याच सभागृहात उपस्थित होत्या 50% महिला

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबानच्या दडपशाहीमुळे महिलांवर देश सोडून जाण्याची वेळ

तालिबानने अनेक दावे केले असले तरी अफगाणिस्तानात महिलांच्या स्थितीचा अंदाज या छायाचित्रावरून येतो. तालिबानचे कार्यकारी उच्च शिक्षणमंत्री बकी हक्कानी यांनी विद्यापीठांतील शिक्षक-प्रशासकांची बैठक घेतली. बैठकीला एकही महिला आली नाही. गेल्या महिन्यात अफगाणिस्तान सरकारने याच लॉय जिरगा ऑडिटोरियममध्ये बैठक घेतली होती, तेव्हा येथे ५०% आसनांवर महिला होत्या. बैठकीत हक्कानी म्हणाले की, मुलींना शिकण्याची परवानगी असेल, पण वर्ग वेगळे असतील.

लादेनचा सुरक्षा प्रमुख राहिलेला अमीन परतला
अमीन-उल-हक तोराबोराच्या पहाडांत ओसामा बिन लादेनचा सुरक्षा प्रमुख होता. लादेन मारला गेल्यावरही तो अल कायदाचा मोठा चेहरा आहे. रविवारी तो नानगरहर प्रांतात दिसला, तेथे त्याचे स्वागत झाले. तो आतापर्यंत कुठे होता, याची कुठलाही ठोस माहिती मिळालेली नाही.

महिला पत्रकार बेहेस्ताही देश सोडून निघून गेल्या
टोलो न्यूज या न्यूज चॅनलच्या पत्रकार बेहेस्ता अरगहांद देश सोडून गेल्या आहेत. तालिबानच्या कब्जानंतर त्याच्या प्रतिनिधीची मुलाखत घेणाऱ्या त्या पहिल्या पत्रकार होत्या. नंतर त्यांनी नोबेल विजेत्या मलाला युसूफझईचीही मुलाखत घेतली होती. तेव्हापासून त्यांना धमक्या मिळत होत्या.

बातम्या आणखी आहेत...