आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूज कंटेंटच्या बदल्यात त्याच्या मूळ प्रकाशकाला मोबदला द्यावा लागेल, अशी तरतूद करणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिला देश बनू पाहत आहे. मात्र नव्या कायद्यावरून गुगलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियातून सर्च इंजिनची सेवा बंद करण्याची धमकीही दिली आहे. त्याला पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कडक शब्दांत सुनावले. धमक्यांपुढे झुकणार नाही. आॅस्ट्रेलिया स्वत:चे नियम तयार करतो. संसदेत तो तयार होतो. ऑस्ट्रेलियात काम करू इच्छित असाल तर स्वागत आहे. परंतु धमक्यांना उत्तर दिले जाणार नाही. दोन्ही कंपन्यांना जास्त शक्ती मिळणे लोकशाहीसाठी घातक आहेे, असे त्यांनी म्हटले. गुगलला ऑस्ट्रेलियातून वार्षिक ३० हजार कोटींची कमाई होते.
गुगलचा बाजारातील वाटा ८८ टक्के
गूगलचा जागतिक बाजारपेठेतील वाटा ८८.१४ टक्के राहिला आहे. बिंगचे बाजारातील भाग ६.१८ , याहू-४ टक्के आहे. यांडेक्स, बायडूचे ०.५९ टक्के आहे. १९९७ मध्ये सुरू झालेले गुगल मार्केट लीडर राहिले आहे. या कंपनीला जाहिराती, प्रॉडक्टिव्हिटी टूल्स, व्यावसायिक उत्पादनांतून जास्त उत्पन्न होते. कंपनीचा व्याप मोबाइलसह इतर उत्पादनांपर्यंत पसरला आहे. ऑस्ट्रेलियातून वार्षिक ३० हजार कोटींचे उत्पन्न मिळत असल्याने गूगल नाराज आहे.
मीडिया मोबदला कायद्यावरून तणातणी
सर्च इंजिन व ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यात मीडिया मोबदला कायद्यावरून एक महिन्यापासून वाद सुरू आहे. जगात पहिल्यांदाच अशा प्रकारचा कायदा तयार केला जात आहे. स्थानिक मीडिया कंपन्यांच्या बातम्या सर्च इंजिनवर दाखवण्यासाठी पैशांचा मोबदला द्यावा लागू शकतो. या प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरू आहे. लवकरच मतदानही होऊ शकते. टेक कंपन्यांनी त्यास विरोध केला आहे. तसे झाल्यास इतर देशही असा कायदा लागू करतील, अशी भीती टेक कंपन्यांना वाटते. मात्र हा कायदा रद्द करून स्वेच्छिक कोड आणला पाहिजे, असा सल्ला अमेरिकेने दिला.
बातम्यांच्या कमाईतील ८१ टक्के गुगल, फेसबुकला जातात
ऑस्ट्रेलियात वृत्त उद्योगाची स्थिती वाईट आहे. डिजिटल जाहिरातींवर खर्च केलेल्या प्रत्येकी १०० ऑस्ट्रेलिया डॉलरपैकी ८१ गुगल व फेसबुकला मिळतात. म्हणजेच ५६०० रुपयांपैकी ४५५० रुपये मिळतात. दुसरीकडे सातत्याने नुकसान होत असल्याने ऑस्ट्रेलियातील अनेक माध्यम संस्था बंद पडल्या आहेत. गुगलचा नफा मात्र वाढतोय. ऑनलाइन माहितीच्या प्रवाहाला रोखले जाऊ शकत नाही. इंटरनेट अशाच पद्धतीने काम करते, असे टेक कंपनीचे म्हणणे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.