आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासगळे जग कोरोना महामारीला तोंड देत आहे. भारतात वाढत्या संसर्गामुळे अनेक देशांनी हवाई वाहतूक रोखली आहे. वास्तविक भारतच नव्हे, तर जगभरातील अनेक देश सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. इराण, तुर्की, दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसह अनेक देशांत संसर्गाने भयावह रूप धारण केले आहे. तुर्कीचे आरोग्यमंत्री फरहेटिन कोको म्हणाले, लसीकरणाची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला किमान दोन महिने लागतील. श्रीमंत देशांनी आपल्या गरजेच्या दुप्पट डोसची साठेबाजी केली आहे. त्यामुळे जगभरात डोसचा तुटवडा भासतोय. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार गरीब देशांत ५०० लोकांपैकी एकाने डोस घेतला आहे. श्रीमंत देशांत मात्र प्रत्येकी चारपैकी एकाने लस घेतली आहे. लसीव्यतिरिक्त गरीब व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत ऑक्सिजन, कॉन्सट्रेटर, व्हेंटिलेटर व आैषधींचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अशा देशांपुढे समस्या आहेत.
कुठे ऑक्सिजन नाही, कुठे लसीसाठी द्यावी लागतेय लाच
ब्राझील : ६ टक्क्यांहून कमी लोकांना डोस. भारतानंतर सर्वाधिक रुग्ण आढळणारा देश.
तुर्की : तिसरी लाट आल्यानंतर पहिल्यांदा लॉकडाऊन लागू. उत्पन्न बंद. बेरोजगार वाढले
मेक्सिको : लसीची मारामार. अनेक ठिकाणी नकली डोसची खेप जप्त करण्यात आली.
इराण : २०० शहरांत रेड अलर्ट घोषित. लाॅकडाऊन लावून संसर्ग रोखला जातोय.
दक्षिण अाफ्रिका : भारतातून लस मिळत नसल्याने लसीकरण थांबले. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस नाही.
अर्जेंटिना : मोठ्या शहरांतील आयसीयू जागा नाही. नवीन रुग्णांत तरुणांची संख्या जास्त.
पेरू: लस घेण्यासाठी लोकांना लाच द्यावी लागतेय. बेकारीमुळे बेघर लोक रस्त्यावर उतरले.
कोस्टारिका: एक आठवड्यापासून ५० टक्क्यांहून जास्त रुग्ण. आता रुग्णशय्यांचा तुटवडा.
केनिया : जानेवारीच्या अखेरीस मृतांचे प्रमाण ६७४ टक्क्यांनी वाढले.
श्रीमंत देशांनी लसींची साठेबाजी केल्याने जगभरात तुटवडा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.