आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:नोव्हेंबर विक्रमी उष्ण, 2020 देखील उष्ण वर्ष होण्याच्या दिशेने; शास्त्रज्ञ म्हणाले, ला निनाचा कूलिंग इफेक्टही प्रभावी नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोपीय संघाचा धक्कादायक अहवाल, आर्क्टिक समुद्रात बर्फ गोठण्याचा वेग मंदावला

हेनरी फाउंटेन
भारतात हिवाळ्याचा प्रारंभ म्हणून ओळखला जाणारा नोव्हेंबर जागतिक पातळीवर सर्वात उष्ण म्हणून नोंदवला गेला आहे. युरोपीय संघाच्या उपग्रह देखरेख सेवा कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या शास्त्रज्ञांनी सोमवारी जाहीर अहवालात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२० मध्ये जागतिक तापमान नोव्हेंबर २०१६ व नोव्हेंबर २०१९ पेक्षा ०.१ अंश जास्त होते. ते १९८१ ते २०१० या ३० वर्षातील सरासरीपेक्षाही ०.८ अंश जास्त आहे.

शास्त्रज्ञांनुसार उत्तर युराेपापासून सैबेरिया व आर्क्टिक समुद्रापर्यंत तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. यंदा आतापर्यंत तापमान २०१६ (सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद) एवढेच राहिले आहे. संचालक कार्लो बूनटेम्पो यांनी सांगितले की, डिसेंबरमध्येही तापमान एकदम उतरणार नाही. हवामानातील जोखीम कमी करण्यास प्राधान्य देणाऱ्या धोरण निर्मात्यांनी ही आकडेवारी इशारा म्हणून घ्यायला हवी. शास्त्रज्ञांनुसार यंदा सप्टेंबरमध्ये ला निनाचा प्रभाव सुरू झाला होता. सामान्यपणे त्याचा कूलिंग इफेक्ट होतो. गेल्या महिन्यात नॅशनल एशियाटिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननेदेखील म्हटले होते की, ला निना मजबूत झाली. मात्र, वर्ल्ड मेटेरियोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, २०२० सर्वात उष्ण तीन वर्षांपैकी एक होण्याच्या मार्गावर आहे. पेटेरी टालस यांच्यानुसार ला निनाचा कूलिंग इफेक्टही उष्णता कमी करण्यास पुरेसा नसेल. कोपर्निकस सर्व्हिसच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, युरोपीय युनियनचा उपग्रह १९७९ पासून आर्क्टिकवर लक्ष ठेवून आहे. तेव्हापासून प्रथमच आर्क्टिक समुद्रात नोव्हेंबरमध्ये बर्फ गोठण्याचा वेग मंदावला आहे. याचा अर्थ बर्फाचा थर पातळ होईल व उन्हाळ्यात वेगाने वितळेल.

मानवी हस्तक्षेपामुळे सरासरी जागतिक तापमान अभूतपूर्व पद्धतीने वाढतेय
क्लायमेट डायनामिक्सच्या संशोधक मियामी विद्यापीठाच्या मॅरीबेथ अकॉर्डिया यांच्यानुसार ला नीनाचा प्रभाव कमी करण्यास अनेक हवामान घटक आहेत. मात्र, सर्वात मोठे घटक मानवाद्वारे वातावरणातील बदल आहेत. त्या सांगतात, मानवी हस्तक्षेपामुळे सरासरी जागतिक तापमान अभूतपूर्व पद्धतीने वाढत आहे. हेच मुख्य कारण आहे. म्हणून तापमान कमी करणारे ला नीना सारखे प्रभाव असले तरी विक्रमी तापमान बघावयास मिळत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser