आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Now It's Time To Take A Dose Of 90,000 In Iran !; The Worst Case Of Corona Infection; News And Live Updates

कोरोना महामारी:इराणमध्ये आता 90 हजार देऊन डोस घेण्याची वेळ!; कोरोना संसर्गाची सर्वात वाईट स्थिती, सर्वाधिक 655 नागरिकांचा महामारीने मृत्यू

तेहरान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या आणि जुन्या सरकारच्या भांडणात लस अडकली

काेराेना संसर्गाची इराणमध्ये सर्वात वाईट स्थिती आहे. मंगळवारी आतापर्यंतचे सर्वाधिक ५० हजार २२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याच आठवड्याच्या सुरुवातीला काेराेनामुळे सर्वाधिक ६५५ मृत्यूंची नाेंद झाली. त्यातच देशात काेराेना डाेसचादेखील माेठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे लाेकांवर काळ्याबाजारातून डाेस खरेदी करण्याची वेळ आली आहे. देशाचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या एका घाेषणेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे काहींना वाटते. देशात अमेरिका व ब्रिटननिर्मित काेराेना लसींचे डाेस दिले जाणार नाहीत, असे फर्मान खामेनींनी जानेवारीत काढले हाेते. कारण या लसी विश्वास ठेवण्यालायक नसल्याचा दावा खामेनी यांनी केला हाेता. वास्तविक इराणमध्ये आर्थिक नियाेजनाचा अभाव, भ्रष्टाचारदेखील लसीकरण कमी हाेण्यामागील कारणे आहेत.

इराणची लाेकसंख्या ८.५ काेटींवर आहे. त्यापैकी ३५ लाख लाेकसंख्येचे लसीकरण झाले आहे. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आमिर अली म्हणाले, लस आयात करण्याची परवानगी मिळाल्यास आणि व्यवस्थापनात पारदर्शकता अाल्यास माझ्या आईचे प्राण वाचवता आले असते. एक तरुण व्यावसायिक मेयसम म्हणाले, मी आणि माझ्या कुटुंबाने फायझरचे दाेन डाेस एका अज्ञात डीलरकडून खरेदी केले. काळ्याबाजारात लसीचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. फायझरच्या एका डाेसची किंमत ३० हजार रुपयांपासून ९० हजारांपर्यंत आहे. अॅस्ट्राझेनेकाच्या एका डाेसची किंमत ११ हजारांपासून १९ हजार रुपयांपर्यंत आहे. इराणच्या लाेकांसाठी ही माेठी किंमत आहे.

कारण येथे सरासरी वेतन प्रतिमाह ११ हजारांपासून १५ हजारांपर्यंत आहे. इराणमधील रुग्णालये हतबल दिसून येत आहेत. तेहरानमधील एक डाॅक्टर म्हणाले, रुग्णांवर उपचार करण्यायाेग्य साधने आमच्याकडे शिल्लक राहिलेली नाहीत. लाेकसंख्येच्या दृष्टीने दुसरे माेठे शहर मशहदचे डाॅक्टर नफीसेह सगफी म्हणाले, युद्धासारखी भयंकर स्थिती आहे. सरकारी आकडेवारीनुसार काेराेनामुळे आतापर्यंत ९३ हजार मृत्युमुखी पडले आहेत. परंतु देशात काेराेनामुळे आतापर्यंत १ लाख ९४ हजार जणांचा मृत्यू झाला.

नव्या आणि जुन्या सरकारच्या भांडणात लस अडकली
इराणच्या काेराेना टास्क फाेर्सचे प्रमुख डाॅ. अलीरजा जाली म्हणाले, इराणने सुरुवातीपासूनच जागतिक आराेग्य संघटनेला सहकार्य केले जाणार नसल्याचे जाहीर केले हाेते. काेराेना रुग्णांची संख्या, मृत्यूंचे प्रमाण, लसीवरील खर्च इत्यादीची वास्तविक माहिती देण्यास इराणने नकार दिला हाेता. जाली यांच्या वक्तव्यावर माजी परराष्ट्रमंत्री जवाद जरीफ म्हणाले, रुहानी यांच्या कार्यकाळात रशिया आणि चीनच्या लसी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला हाेता.


बातम्या आणखी आहेत...