आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोराेनाकाळात नोकरदार महिलांचे घराबाहेर पडणे जवळपास बंद झाले. आता तर ऑनलाइन क्लास व मीटिंगवरच भर आहे. तथापि, महिलांची नटण्या-थटण्यावरची मेहनत कमी झाली नाही. त्यांना जेवढा वेळ ऑफिसला जाण्यासाठी तयार होण्यात लागायचा, तेवढाच वेळ ऑनलाइन मीटिंगसाठी तयार होण्यास लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन व्हर्च्युअल मेकअप टूलचा ट्रेंड आला आहे. यात ऑनलाइन मीटिंगला कनेक्ट होण्यासाठी मेकअपची गरज नसते. फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवरील पर्यायांपैकी एक निवडायचा. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाताच तुमचा चेहरा मीटिंगमधील लोकांना छानपैकी मेकअप केल्यासारखा दिसेल.
ही ई-मेकओव्हर रेंज ऑग्युमेंटेड रिअॅलिटी तंत्रज्ञानावर काम करते. त्या प्लॅटफॉर्मवर अनेक डिजिटल लूक अाहेत. कॅट मॉस व लेडी गागासोबत काम केलेली ग्लोबल मेकअप डायरेक्टर वेल गारलँडने हे लूक तयार केले आहेत. त्याच्या फिल्टर आयकॉनवर टॅप केल्यानंतर हे लूक निवडता येतात. ट्राय इट फंक्शनमध्ये मेकअपची शेड, आयलायनरसोबत बीड्स, ग्लॉस सेक्शनमध्येही अावडत्या शेड्स निवडता येतात.
२०२० मध्ये ‘ब्यूटी इंडस्ट्री’ला ३०% नुकसान झाल्याचा अंदाज
ब्यूटी इंडस्ट्रीला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. रिटेल आऊटलेट बंद होते, विमान प्रवासावर बंदीने ड्यूटी फ्री शॉपिंगवरही परिणाम झाला. मॅकेन्झीनुसार, ब्यूटी इंडस्ट्रीचे उत्पन्न २०२० मध्ये ३०% पर्यंत घटू शकते. बड्या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड्सना या संकटामुळे ऑनलाइन ब्यूटी टूल्स लाँच करणे भाग पडले आहे. इंडस्ट्री तज्ज्ञांनुसार, आजवर विविध अॅप्सवर अनेक प्रकारचे फिल्टर उपलब्ध होते. मात्र लेकिन व्हर्च्युअल मीटिंगसाठी असा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.