आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांपूर्वी बायडेन यांनी प्रिन्सकडे कानाडाेळा केला:आता रशियाच्या हल्ल्यानंतर त्याच अटींवर जेद्दाहमध्ये भेट

जेद्दाह17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांनी सौदी अरेबियाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात ऐतिहासिक बदल करून दाखवले. कट्टरवादी विचारसरणीच्या देशात महिलांना अधिकार देणे यासारखा सकारात्मक बदल जगासाठी आदर्शवत ठरला. तसे तर लहानपणापासून कट्टर असलेल्या प्रिन्स सलमान यांना राजमहालात भेदभावाची वागणूक मिळाली होती. त्यांची आई वडिलांची तिसरी पत्नी होत. सलमान यांची आई आदिवासी समुदायातील आहेत. त्यांची सावत्र भावंडे सलमान यांना ‘कंजर की आैलाद’ असे संबोधून त्यांची थट्टा करायचे.

या भावंडांनी परदेशात शिक्षण घेतले. परंतु सलमान यांचे देशातच शिक्षण झाले. परंतु सलमान यांनी हा भेदभाव जिद्द व विचारांतून बदलून दाखवला. म्हणूनच आज ते सौदीत सर्वात शक्तिशाली मानले जातात. भलेही त्यांचे वडील सुलतान असले तरी सत्तेची सूत्रे थेट सलमान यांच्या हाती आहेत. इतरांना झुकवणे हा सलमान यांचा स्वभाव राहिला आहे. त्याचे मोठे उदाहरण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आहेत. चार वर्षांपूर्वी वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगींच्या हत्येनंतर प्रिन्स यांच्यावर जागतिक स्तरावरून टीका होत होती. परंतु त्यावेळी अमेरिकेच्या दौऱ्यात तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले होते. तेव्हा विरोधी नेते बायडेन यांनी त्यांच्याकडे कानाडोळा केला. तेव्हा प्रिन्स शांत राहिले. परंतु पुढे रशियाच्या हल्ल्यानंतर त्याच अटींवर जेद्दाहमध्ये त्यांची भेट झाली.

आईशी कुरबुर झाल्यानंतर छताची गोळीबारात चाळणी प्रिन्स सलमान अतिशय अडेलतट्टू व क्रूरदेखील आहेत. एकदा त्यांचे आईसोबत भांडण झाले. त्यांना एवढा संताप आला की त्यांनी आईच्या समोर महालाच्या छतावर बेछूट गोळीबार केला. त्यात छताची चाळणी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...