आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Now The Era Of Maharajah In Britain, After The Death Of His Mother, Prince Charles Is Now The New King Of Britain

ब्रिटनमध्ये आता महाराजा युग:आईच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे नवे राजे, पत्नीला मिळणार कोहिनूरचा मुकुट

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ९६ वर्षीय एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडच्या बालमोरा कॅसलमध्ये अखेरचा श्वास घेतला. याआधी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले होते. स्थिती सुधारत नसल्याचे पाहून नातेवाइकांना बोलावण्यात आले.

महाराणीचे अधिकृत निवासस्थान बकिंगहॅम पॅलेसने भारतीय वेळेनुसार ११.१५ वाजता निधनाची घोषणा केली. यासोबत त्यांचा मोठा मुलगा ७४ वर्षीय प्रिन्स चार्ल्सना नवे राजे आणि राज्य प्रमुख केले. चार्ल्स १४ राष्ट्रकुल क्षेत्रांचे राजे असतील. त्यांना चार्ल्स ३ संबोधले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी महाराणीच्या निधनाबाद्दल दु:ख व्यक्त केले.

७ शतकात १५ पीएम : एलिझाबेथ यांनी १५ पंतप्रधानांची नियुक्ती केली. त्यांच्या राज्याभिषेकावेळी विन्सन चर्चिल पंतप्रधान होते. १९५५ मध्ये त्यांनी अँथनी एडन यांना पहिले पंतप्रधान नियुक्त केले आणि मंगळवारी १५ व्या पीएम लिज ट्रस यांची नियुक्ती केली.

लहानपणी लाजाळू ... गावची मुलगी होऊ इच्छित होत्या : एलिझा लहानपणी लाजाळू होत्या. ६ व्या वर्षी शिक्षकाने सांगितले होते की, गावची मुलगी होऊ इच्छिते आणि अनेक घोडे-श्वान पाळू इच्छिते. १९३६ मध्ये मोठे चुलते एडवर्डने घटस्फोटित अमेरिकी महिलेशी लग्न करण्यासाठी राजा होण्यास नकार दिला हाेता. यानंतर एलिझाबेथ २ जून १९५३ रोजी २७ व्या वर्षी ब्रिटनची राणी झाल्या.

दोन वाढदिवस साजरे करत असत

-महाराणींचा वाढदिवस २१ एप्रिल व जूनच्या कुठल्याही एका शनिवारी साजरा केला जात होता. जूनमध्येच त्यांचा राज्याभिषेक झाला होता. -त्यांनी पासपोर्टविना जगातील १२८ पेक्षा जास्त देशांचा दौरा केला होता.-महाराणींनी आयुष्यात फक्त एकदा २००८ मध्ये बीबीसीला मुलाखत दिली होती.

चार्ल्सची पत्नी कॅमिला आता राणी, कोहिनूरचा मुकुट मिळणार
-नवे राजे चार्ल्स यांची पहिली पत्नी डायना होती.
-चार्ल्स राजे झाल्यानंतर आता त्यांची दुसरी पत्नी कॅमिलाला महाराणीचा प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्यांचा मुकुट मिळेल.

बातम्या आणखी आहेत...