आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत भारतीय वंशाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच एक चांगली बातमी अशी आहे की, तिथे मंदिरांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. लॉस एंजलिसपासून न्यूयॉकपर्यंत घंटांचा आवाज आणि भजनाचे चिरपरिचित स्वर बनत चालले आहेत. भारताच्या प्रत्येक भाषीय आणि स्थानिक हिंदू समूहांचे प्रतिनिधित्व करणारी मंदिरे संपूर्ण अमेरिकेत आपले अस्तित्व दर्शवत आहेत. याचा परिणाम असा की, जलदगतीने मंदिरांसाठी पैशांचा ओघही वाढत आहे. कॉफी टेबल बुक ‘अमेरिका में भारत रेखा’ नुसार, अमेरिकेत 2006 मध्ये 53 मंदिरे होती. वर्ष 2017 मध्ये ती वाढून 250 झाली आहेत. 2022 मध्ये ही संख्या 750 झाली आहे. या पाच वर्षांतच त्यांची संख्या वाढली आहे. या काळात जवळपास 200% मंदिरे वाढली. इंजिनिअर केटी लक्ष्मी असेही संकेत देत आहेत की, अमेरिकेत भारतीय लोेक भारताशी आपले असणारे भावनात्मक संबंधांची जाणीव करून घेत आहेत.
मंदिरांची वाढती संख्या असे संकेत देत आहे की, 10 लाखांहून अधिक भारतीयांनी अमेरिकेला आपले घर बनवले आहे. वेदांत सोसायटीने अमेरिकेत पहिले मंदिर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 1905 मध्ये बनवले. न्यूयॉर्कमध्ये एका रस्त्याला ‘गणेश टेंपल स्ट्रीट’ नाव आहे.
अमेरिकेतील काही प्रसिद्ध मंदिरे
अक्षरधाम मंदिर, न्यूजर्सी, श्री स्वामीनारायण मंदिर, अटलांटा, न्यू वृंदावन मंदिर, वेस्ट वर्जीनिया, श्री शिव विष्णु मंदिर, मेरीलँड, ब्रज हिंदू मंदिर, पेनसिल्वेनिया, गणेश मंदिर, फ्लशिंग, न्यूयॉर्क, श्री स्वामीनारायण मंदिर, ह्यूस्टन.
भारताबद्दल ओढ
अमेरिकेत अर्धा डझनापेक्षा जास्त मंदिरे नसतील असे एकही राज्य नाही. न्यूयॉर्क-कॅलिफोर्निया या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी शेकडो मोठी मंदिरे आहेत. फ्लोरिडामध्ये 60 हून अधिक, जॉर्जियाम 30 हून अधिक मंदिरे आहेत. वाढती मंदिरे हिंदूंना त्यांचा देश आणि संस्कृतीशी जोडत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.