आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Now The Threat Has Increased In African Countries, With The Top 10 Affected Countries D. Africa; Emergency Escalated

महामारी:आता आफ्रिकी देशांमध्ये धोका वाढला, टॉप 10 बाधित देशांमध्ये द. आफ्रिका; आणीबाणी वाढवली

जोहान्सबर्ग/ लंडन3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • एक लसीने काहीही होणार नाही, पुन्हा होऊ शकतो कोरोना : संशोधन

दक्षिण आफ्रिका देशाचा समावेश कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या १० देशांमध्ये झाला आहे. आतापर्यंत येथे २,७६,२४२ रुग्ण आढळले आहेत, तर ४,०७९ मृत्यू झाले आहेत. यामुळे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी देशात १५ ऑगस्टपर्यंत आणीबाणी वाढवली आहे. यानुसार दररोज रात्री ९ ते पहाटे ४ या वेळेत कर्फ्यू असेल. दारू विक्री व वितरणावरही पुन्हा बंदी आहे. कौटुंबिक भेटी आणि सामाजिक भेटीदेखील प्रतिबंधित असतील. राष्ट्राध्यक्ष म्हणाले, दररोज सरासरी १२ हजार नवीन रुग्ण नोंदवले जात आहेत. बरेच नागरिक मास्क लावणे आणि अंतर राखणे यासारख्या खबरदारीच्या नियमांचे पालन करत नाहीत.

दुसरीकडे ब्रिटनमध्ये अनलॉकचा नवीन टप्पा सुरू झाला आहे. यानंतर सलूनसह इतर व्यवसाय येथे सुरू झाले. यूकेचे व्यापार मंत्री आलोक शर्मा म्हणाले, आम्हाला शक्य तितके व्यवसाय पुन्हा सुरू करायचे आहेत. परंतु असे करणे लोकांसाठी सुरक्षित असेल याबाबत आम्हाला आत्मविश्वास हवा.

एक लसीने काहीही होणार नाही, पुन्हा होऊ शकतो कोरोना : संशोधन

कोरोनातून बरे होणारे लोक काही महिन्यांनंतर प्रतिकारशक्ती गमावू शकतात व यामुळे त्यांना पुन्हा विषाणूची बाधा पुन्हा होऊ शकते. लंडनच्या किंग्ज कॉलेजने केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे. स्पेनच्या संशोधनात रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज काही आठवड्यांत नाहीशा होऊ शकतात असे आढळले होते. गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी ९० रुग्णांच्या रोगप्रतिकारक प्रतिसादाचा अभ्यास केला. अभ्यासामध्ये कोरोना लक्षणे सुरू झाल्यानंतर ३ आठवड्यांनंतर अँटिबॉडीज सर्वाधिक प्रमाणात आढळल्या. परंतु नंतर हळूहळू कमी झाल्या. संशोधनाचे प्रमुख लेखक आणि किंग्ज कॉलेजमधील डॉक्टर केटी डोअर्स म्हणतात, लोकांमध्ये अँटिबॉडी तयार होत आहेत, परंतु थोड्याच वेळात त्या कमी होऊ लागतात. लोका कोरोना विषाणूपासून जास्त काळ सुरक्षित राहणार नाही, असे आढळले आहे.