आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:आता अंतराळातूनही तुमच्या घराची खिडकी उघडी आहे की दरवाजा हे शोधता येणार

न्यूयॉर्क6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इन्फ्रा रेड उपग्रहाद्वारे घराच्या ऊर्जेच्या अचूक आकलनातून हे शक्य

तुमच्या घराची खिडकी उघडी आहे की दरवाजा? या प्रश्नाचे उत्तर अंतराळात बसूनही देता येऊ शकेल. विश्वास बसत नसला तरी घरातून निघणाऱ्या ऊर्जेच्या अचूक आकलनातून हे साध्य होणार आहे. ब्रिटिश सरकार एक हीट सेन्सिंग सॅटेलाइटच्या तयारीला लागले आहे. हाय डेफिनेशन इन्फ्रारेड रेडिएशन डिटेक्टरच्या साह्याने ऊर्जा उत्सर्जनाचे अचूक आकलन करता येऊ शकते. स्पेस कंपनी सॅटेलाइट व्हीयूचे प्रमुख अँथनी बेकर म्हणाले, या उपग्रहात युनिक इन्फ्रा रेड कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याच्या मदतीने कोणत्याही ग्रहावर बसून घरातून निघणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनाची गणना केली जाऊ शकते. ते म्हणाले, ग्रीन हाऊस गॅसच्या उत्सर्जनाला शून्यापर्यंत आणणे हे सर्वात कठीण काम आहे. कारण घर, कार्यालये, कारखान्यांत ऊर्जेचे उत्सर्जन मोठ्या वेगाने होत असताना हे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. आकडेवारीनुसार याद्वारे आपली कंपनी, सरकारी उपक्रमांतून विजेचा वापर आणि त्यावर होणाऱ्या खर्चालादेखील कमी करता येऊ शकते. कंपनीकडून या उपग्रहाच्या निर्मितीपूर्वी गिल्डफोर्ड शहरात सात थर्मल इमेजिंग चाचणी घेण्यात येणार आहे. उपग्रह व्हीयूने एक घोषणा केली आहे. पुढील वर्षीपर्यंत या उपग्रहाला फाल्कन-९ रॉकेटच्या साह्याने एलन मस्कची कंपनी स्पेस-एक्सद्वारे सोडण्यात येणार आहे.

वणवा, दरड कोसळण्याचा अंदाज लावता येणार
या कार्यक्रमासाठी ब्रिटिश स्पेस एजन्सी २०० कोटींहून जास्त रक्कम खर्च करणार आहे. उपग्रहाद्वारे दोन अंश सेल्सियसपर्यंतच्या तापमानाची अचूक गणना करता येईल. त्याशिवाय वणवा, दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक संकटांचादेखील अंदाज लावता येईल.

बातम्या आणखी आहेत...