आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना चाचणी:आता कोरोना संसर्गासाठी होणार श्वासाची चाचणी, सिंगापूर सरकारची मंजुरी

जॅरेक वॉलबँक | सिंगापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय आहे ब्रेथोनिक्स ?

काेराेना संसर्गाची अाेळख पटवण्यासाठी सिंगापूरमध्ये अाता ‘ब्रेथ’ म्हणजे श्वासाची चाचणी करण्यात येईल. त्याचा अहवालही लगेच मिळेल. सरकारने या चाचणीसाठी परवानगी दिलेली अाहे. याची रचना सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीने केली अाहे.

मिळालेल्या माहितीनुसार मलेशियातून सिंगापूरच्या पश्चिम भागातील तुअास चेकपाेस्टमध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी सरकार या ठिकाणी श्वासाची चाचणी (ब्रेथाेनेक्स) बंधनकारक करणार अाहे. जर या चाचणीत एखादी व्यक्ती पाॅझिटिव्ह अाली तर त्याच्या खात्रीसाठी पीसीअार स्वॅब चाचणीही केली जाईल. सिंगापूर सरकार सर्व प्रवाशांची अँटिजन रॅपिड टेस्ट करत अाहे. परंतु श्वासाच्या चाचणीसाेबत बाकीच्या चाचण्यादेखील सुरू राहणार अाहेत.

काय अाहे ब्रेथाेनिक्स ?
ब्रेथाेनिक्स किंवा ब्रेथ टेस्ट ही ब्रेथलायझरसारखीच असून त्याचा उपयाेग पाेलिस मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची अाेळख पटवण्यासाठी केला जाताे. संबंधित व्यक्तीला माऊथपीसच्या व्हाॅल्व्हमध्ये श्वास साेडावा लागताे. या उपकरणातील साॅफ्टवेअर हा श्वास संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या (पाॅझिटिव्ह) श्वासाबराेबर माेजला जाताे. तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काही मिनिटांतच अहवाल मिळताे. ब्रेथाेनिक्स चाचणीसाठी तीन क्लिनिकल ट्रायल करण्यात अाल्या अाहेत.

बातम्या आणखी आहेत...