आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक आठवडे निदर्शनानंतर चीन सरकार आपल्या झीराे काेविड धाेरणात बदल करण्यास तयार झाले आहे. चीन सरकारने काेराेनामुळे लागू केलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. त्या अंतर्गत काेराेनाचा फैलाव राेखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्या एेवजी किंवा त्या भागाएेवजी विशिष्ट इमारत किंवा मजल्यापुरते हे नियम लागू राहतील. नव्या तरतुदीनुसार काेराेना बाधित आता उपचारासाठी सरकारी केंद्रात दाखल हाेण्याएेवजी घरातच क्वारंटाइन हाेऊ शकतात. बाधित आढळून न आलेल्या शाळांत आॅफलाइन वर्ग घेण्यास चीन सरकारने परवानगी दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीनमध्ये कुठेही जाताना साेबत काेराेना निगेटिव्ह अहवाल बाळगण्याची गरज भासणार नाही. परंतु शाळा व रुग्णालयांसाठी मात्र आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य आहे. उच्च जोखीम क्षेत्र वगळता सर्व कारखानेही सुरू झाले आहेत.
झीरो धोरण : त्रिस्तरीय कोविड धोरणाला मागे घेण्याचा निर्णय
चीनमध्ये झीराे काेविड धाेरण त्रिस्तरीय अशा स्वरूपात लागू हाेते. त्यात पहिला मुद्दा व्यापक पातळीवर तपासणी करणे. त्यामुळे रुग्णांची ओळख पटणार आहे. दुसरा मुद्दा क्वारंटाइनची केंद्रीय व्यवस्था. त्यानुसार बाधितांना सरकारी रुग्णालयात राहावे लागत हाेते. तिसरे म्हणजे लाॅकडाऊनद्वारे महामारीचा फैलाव राेखणे. आता या तीन निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे.
जनतेत असंताेष धुमसतोय, केव्हाही भडका
चीनमध्ये भलेही निर्बंध साैम्य करण्यात आले असले तरी त्यामुळे असंताेष थांबेल, असे दिसत नाही. सामान्य नागरिकांमध्ये असंताेष सातत्याने धुमसत आहे. म्हणूनच उलट आंदाेलन आणखी वाढण्याचा अंदाज आहे. एक ट्विटर यूजर म्हणाले, देशात इंटरनेट बंदी लागू आहे. परंतु साेशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमच्या व्यथा, संताप जगासमाेर मांडत आहाेत. इटलीवंशीय आर्टचे विद्यार्थी छॅत्र लीने जिनपिंग यांच्या विराेधातील आंदाेलनात मदत केली हाेती.
या माध्यमातून पीडितांचे व्हिडिओ, छायाचित्रे, आपल्याच धाेरणांबद्दल सरकारला असलेली अनिच्छा चव्हाट्यावर आणली जाऊ शकेल. त्याबद्दलची रंजक माहिती उजेडात आली आहे. त्यात देशाची चिंता, समस्येबाबत वेगळी माहिती मिळाली आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एक जण म्हणाला, सातत्याने अव्यावहारिक असे धाेरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे असुरक्षितता वाढू लागली आहे. चीन सरकारने अद्यापही वास्तवाचा विचार करून निर्णय घेतले नाहीत. परंतु चीनचा हा डाव उलटा पडू शकताे. नागरिक रस्त्यावर उतरू शकतात. ली यांचे ८ लाखांहून जास्त फाॅलाेअर्स आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.