आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली/ दुबई:नूपुर-जिंदल यांचे वक्तव्य; अरब देशांत ‘बायकॉट इंडिया’भारताने ओआयसीला फटकारले

नवी दिल्ली/ दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित मोहंमद पैगंबरांबाबत भाजप नेत्यांनी केलेल्या टिप्पणीवर अरब देशांत विरोध सुरूच आहे. कुवेतच्या काही सुपर स्टोअर्सनी भारतात तयार सामग्रींची विक्री रोखली आहे. अरब देशांत मंड बायकॉट इंडिया सोशल मीडियात ट्रेंड करत आहे. दुसरीकडे, कुवेत, कतार, सौदी अरेबियानंतर इस्लामिक सहकार्य संघटनाही (ओआयए) भाजपच्या माजी नेत्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे, भारतीय विदेश मंत्रालयाने पाकिस्तान आणि ओआयएचे वक्तव्य फेटाळत ते अनावश्यक आणि संकुचित विचाराची टिप्पणी असल्याचे म्हटले आहे.

नूपुर यांना धमकी; गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी नूपुर शर्मा यांना धमकी मिळाल्याच्या तक्रारींवर गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, आम्ही चौकशी सुरू केली आहे. नूपुर यांना अत्याचारापर्यंत धमकी मिळत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र पोलिस नूपुर यांच्याविरुद्ध दाखल धार्मिक भावना भडकावल्या प्रकरणात चौकशीची तयारी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...