आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Nyari Artists In Masks On The Red Carpet, Corona Testing Every 48 Hours, Vaccinated Participants; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:कानची गोष्टच न्यारी - रेड कार्पेटवर मास्कमध्ये चालतील कलाकार, दर 48 तासांत कोरोना चाचणी, लस घेतलेलेच होतील सहभागी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्रान्समध्ये 74 वा कान फिल्म महोत्सव आजपासून, पूर्णपणे फिजिकली आयोजनमेल्विन नुबौम

जागा तीच, निमित्तही तेच मात्र आधीसारखा उत्साह नाही. आपण बोलतोय फ्रान्समध्ये होणारा वार्षिक कान चित्रपट महोत्सवाबद्दल. मंगळवारी ७४ वा आणि बहुतेक सर्वात महत्त्वाचा महोत्सव भरेल. रेड कार्पेटवर कलाकार पुन्हा चालतील मात्र चेहऱ्यांवर डिझायनर मास्क असतील. सुरक्षेसाठी अनेक शतकांची परंपरा बदलण्यात आली आहे. चंदेरी पडदा पुन्हा उजळेल. चित्रपट रोमान्स व भव्यता पुन्हा दाखवतील जे काही काळापासून हरवली होती. गेल्या वर्षी महोत्सव स्थगित झाला होता, नंतर महामारी वाढल्यामुळे तो रद्द करण्यात आला.

तेव्हा चित्रपटांचे आयोजन करण्याऐवजी ते कोरोना रुग्णांचे निवारास्थान झाले होते. या वर्षाच्या सुरुवातीला या जागेचा लसीकरण केंद्र म्हणून वापर करण्यात आला होता. महामारीच्या काळात पूर्णपणे फिजिकली होणारा हा पहिला चित्रपट महोत्सव असेल. कोणताही व्हर्च्युअल कम्पोनेंट नसेल. मास्क घातलेल्या पाहुण्यांमधील आसन रिक्त नसेल. लोकांना दर ४८ तासांत कोविड चाचणी करावी लागेल. लसीकरण केल्याचे महोत्सवात आवश्यक आहे.

पुन्हा उजळेल चंदेरी पडदा
२०२० मध्ये काही उद्योगांचे खूप नुकसान झाले आहे. चित्रपट उद्योग त्यापैकीच एक. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बॉक्स आॅफिसचे उत्पन्न ८०% कमी होत ६० हजार कोटी राहिले होते. मात्र आता स्थिती बदलत आहे. चीनमध्ये जगातील सर्वात मोठा चित्रपट बाजार २०१९ प्रमाणे घोडदौड करतोय. अमेरिकेत हळू का असेना पण सुरुवात झाली आहे. २५ जूनला प्रदर्शित फास्ट अँड फ्युरिअसने पहिल्या वीकेंडला ५२३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. २०१९ नंतर थांबलेले स्पायडरमॅन आणि जेम्स बाँड सारखे ब्लॉकब्लस्टर प्रेक्षकांना रुपेरी पडद्याकडे पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील.

पहिल्यांदाच कृष्णवर्णीय दिग्दर्शक ली करतील ज्युरीचे नेतृत्व
या वर्षी अनेक चर्चित निर्मात्यांचे चित्रपट दाखवले जातील. त्यात वेसन अँडरसन (द फ्रेन्च डिस्पेच), असगर फरहादी (ए हीरो), पॉल वेरहोवेन (बेनेडेटा), जॅक्स ऑडियार्ड (पेरिस, 13 डिस्ट्रिक्ट), ब्रुनो ड्युमाँट (पार अन डेमी क्लेयर मॅटिन) आणि सीन पेन (फ्लॅग डे) यांचा समावेश आहे. २४ चित्रपट पहिल्यांदाच दाखवले जातील. तसेच पहिल्यांदा ज्युरीचे नेतृत्व अमेरिकेचे कृष्णवर्णीय स्पाइक ली करतील.

बातम्या आणखी आहेत...