आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणाचा दर धोकादायक पातळीवर:युरोपमध्ये महामारीचे रूप घेतोय लठ्ठपणा, धूम्रपानास मागे टाकत लठ्ठपणा कर्करोगाचे मोठे कारण ठरू शकतो

लंडन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपियन देशांमध्ये लठ्ठपणा आता ‘व्यापक आजार’ बनला आहे. हा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून झाला आहे. संघटनेकडून करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लोकांमधील लठ्ठपणाचा दर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे आणि वाढतच आहे.

संघटनेने २०२५ पर्यंत लठ्ठपणाची वाढ रोखण्याचे उद्दिष्ट १२ वर्षांपूर्वी निश्चित केले होते. कोणताही युरोपियन देश हे उद्दिष्ट साध्य करताना दिसत नाही. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, वार्षिक २ लाख कर्करोग्यांचा थेट संबंध लठ्ठपणाशी आहे. हा आकडा आगामी दशकांत आणखी वाढेल. अहवालात हेही म्हटले आहे की, धूम्रपानास मागे टाकत लठ्ठपणा कर्करोगाचे मोठे कारण ठरेल, असा अंदाज काही युरोपियन देश लावत आहेत. युरोपियन देशांतील इस्रायल, माल्टा, तुर्कस्तान आणि ब्रिटनमध्ये लठ्ठपणाच्या सर्वाधिक केसेस आहेत. अहवालानुसार, लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या लोकांना कोरोना महामारीचे नकारात्मक परिणामही सहन करावे लागले. यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम दिसत आहेत. ते बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अहवालात हेही म्हटले आहे की, लठ्ठपणा अस्वस्थ आहार आणि शारीरिक निष्क्रियतेपेक्षा जास्त जटिल आहे. युरोपियन काँग्रेसच्या अहवालानुसार, अमेरिकेनंतर लठ्ठपणाचे शिकार झालेले सर्वाधिक लोक युरोपात आहेत.

ऑनलाइन गेम, उपकरणेदेखील वाढवताहेत लठ्ठपणा
युरोपात डिजिटल उपकरणांचा वापर व ऑनलाइन गेमिंग लठ्ठपणा वाढवण्याचे मोठे कारण आहे. जगात ४०% लोक लठ्ठपणाचा सामना करताहेत. बीएमआय २५- २९.९ असेल तर जास्त वजन आहे. ३० किंवा जास्त म्हणजे तुम्ही लठ्ठ आहात.

बातम्या आणखी आहेत...