आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दिवंगत पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे मृत्युपत्र समोर आले आहे. त्यांचे नेटवर्थ ३.४ कोटी डॉलर(सुमारे २८० कोटी) होते. मृत्युपत्रात त्यांनी संपत्ती तीन मुलांत समान वाटप केली. इव्हाना यांनी आपल्या मुलांसोबत संपत्तीचा एक मोठा भाग मुलांची देखभाल करणारी दाई आणि पाळीव कुत्र्यांच्याही नावे केली आहे. इच्छापत्र तयार करताना इवाना यांनी म्हटले होते की, मी आपल्या वारसा हक्कातील एक भाग पेट टायगर ट्रम्प आणि माझ्या मृत्यूवेळी माझ्याजवळ असलेल्या सर्व प्राण्यांच्या नावे करत आहे. याशिवाय माझी सहायक आणि दाई सुजाना डोरोथी करीलाही मियामी बीचजवळील फ्लॅट देत आहे. त्यांनी पती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काहीही दिले नाही. ७३ वर्षीय इव्हाना यांचा मृत्यू गेल्या वर्षी जुलैमध्ये मॅनहॅटनच्या घरात जिन्यावरून पडल्यामुळे झाला होता.
सुजाना ट्रम्प कुटुंबाच्या खूप जवळची होती. २०१७ मध्ये इवाना यांनी आपले पुस्तक रायजिंग ट्रम्पमध्ये सुजानाचा उल्लेख केला होता. डोळ्यात चमक आणि घाबरलेल्या स्थितीत सुजानाने कामास सुरुवात केली होती. इवानाची मुले मोठी झाल्यावर त्यांनी सुजानाला आपले सहायक केले. सुजाना आयरिश वंशाची महिला आहे. आयरिश मीडियानुसार, ती ट्रम्प कुटुंबाच्या एवढ्या जवळ हाेती की, ट्रम्पच्या मुलांना २०१६ मध्ये ती आपल्या घरी घेऊन गेली होती.
वाॅर्डरोबमधील सामान दान देण्याचा इव्हानाकडून उल्लेख इव्हानाच्या मृत्यूपत्रात वॉर्डरोबमधील वस्तूंचे वाटप निश्चित केले . वॉर्डरोबमधील बहुतांश सामान रेड क्रॉस व सेल्वेशन आर्मीला दान करावे. त्यांच्या फरचे कलेक्शन व दागिने विकून मुलांना समान वाटप करण्यास सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.