आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Obstacle Of Religious Education In The Way Of Modern Education In America, Parental Refusal Due To Pressure

आधुनिक विषयांचे ढोबळ शिक्षण:अमेरिकेतील आधुनिक शिक्षणाच्या मार्गात धार्मिक शिक्षणाचा अडथळा, दबावामुळे पालकांचा नाइलाज

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत आधुनिक व धर्मनिरपेक्ष शिक्षणासाठी कायदा आहे. परंतु प्रत्यक्षात धार्मिक शिक्षण देणाऱ्या हसिदी शाळांत शिकणारी मुले आधुनिक शिक्षणापासून वंचित हाेऊ लागली आहेत. आई-वडिलांवर अनेक प्रकारचे दबाव आहेत. त्यामुळे ते आपल्या मुलांना अशा शाळांतून काढू शकत नसल्याचे दिसते. अशा शाळांमध्ये तर अनेकदा चुकीच्या गाेष्टी शिकवल्या जात आहेत. बिट्रीस वेबर ज्यू समुदायाचे याेशिवा विद्यालयात शिकणाऱ्या आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांत चिंता दिसते. त्यापैकी असलेला १० वर्षांचा आराेनला जगाविषयी खूप कुतूहल आहे. त्याला नासासाेबत करण्याची इच्छा आहे.

परंतु न्यूयाॅर्कमधील इतर ज्यू समुदायाच्या शाळांप्रमाणेच या शाळेतही थाेडेफार इंग्लिश, गणित आणि काही प्रमाणात विज्ञान, समाजविषय अभ्यास शिकवला जाताे. या शाळा विद्यार्थ्यांना ज्यू समुदाय हसिदीच्या मूल्य शिक्षण देतात. ज्यू धर्मातील एक संप्रदाय असलेल्या हसिदीची मूल्ये शिकवली जातात. ज्यू धर्म प्रार्थनेला सर्वाेच्च मानताे. वेबर म्हणाल्या, ग्रह पृथ्वीच्या चाेहीबाजूने परिक्रमा करतात, असे अलीकडे आराेनच्या शिक्षकांनी शिकवले. वास्तविक पृथ्वी इतर ग्रहांसाेबत सूर्याला परिक्रमा घालते. पालकांना पाल्यांना या शाळेतून काढायचे आहे. पण सामाजिक दबावामुळे ते मुलांना इतर शाळेत घालण्याचे धाडसही दाखवू शकत नाहीत.

हसिदी शाळांना कोट्यवधींचे सरकारी अनुदान न्यूयाॅर्कच्या कायद्यानुसार सरकारी शाळांच्या नियमानुसार खासगी शाळांनी तशाच अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली पाहिजे. दरवर्षी लाखाे डाॅलरचा निधी घेऊनही खासगी हसिदी शाळा आधुनिक शिक्षण देत नाहीत

बातम्या आणखी आहेत...