आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:कोव्हॅक्सिन आणण्याच्या तयारीत ओक्युझेन फार्मा, मंजुरी मिळाल्यावर वर्षात 10 कोटी डोसनिर्मिती

न्यूयॉर्क / मोहंमद अली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत बायोटेकने तयार केलेली स्वदेशी लस कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी आहे. अमेरिकेचे फार्मा फर्म ओक्युझेन कोव्हॅक्सिनची व्यावसायिक पातळीवर निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. ही भारतीय अमेरिकींसाठी मोठे राजनीतिक यश मानले जात आहे. कारण, अमेरिका आपल्या नागरिकांना सध्या फायझर आणि मॉडर्नासारख्या मोठ्या कंपन्यांची लस टोचली जात आहे.

ऑक्युझेनने कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर आणि पुरवठ्याला मंजुरी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ते या वर्षी १० कोटी कोव्हॅक्सिन डोस साठवणूक करू इच्छितात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोव्हॅक्सिन ठेवणे खूप सोपे आहे आणि फायझर आणि मॉडर्नाच्या लसींच्या तुलनेत खूप स्वस्त आहे.

ओक्युझेनचे चेअरमन, सीईओ आणि सहसंस्थापक डॉ.शंकर मुसुनुरी यांच्यानुसार, आगामी महिन्यांत कोव्हॅक्सिन अमेरिकी बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. डॉ. शंकर यांच्यानुसार, भारत बायोटेकच्या स्थापनेपासूनच शानदार विक्रम राहिला आहे. त्यांच्या नावावर १४० पेटंट आहेत. कंपनी १६ पेक्षा जास्त लस निर्मिती करते. ११६ देशांमध्ये नोंदणी आणि डब्ल्यूएचओकडून मंजुरी मिळाली आहे. एफडीएची मंजुरीनंतर भारत बायोटेकसोबत कोव्हॅक्सिन निर्मितीचे तंत्रज्ञान हस्तांतरित करेल.

मॉडर्ना-फायझरच्या तुलनेत कोव्हॅक्सिन ठेवणे सोपे
आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत फायझर-बायोटेक, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन मिळून ११० डोस राखीव आहेत. यापैकी ९० टक्के डोस फायझर आणि मॉडर्नाचे आहेत. शंकर यांच्या म्हणण्यानुसार, कोव्हॅक्सिन अमेरिकेत मोठ्यांसोबत मुलांनाही सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झाली आहे. सध्या उपलब्ध आणि संभाव्य लसीच्या तुलनेत याचे अनेक फायदे आहेत. ही स्वस्त आहे आणि फायझर आणि मॉडर्नाच्या तुलनेत तिची देखभाल सोपी आहे. ही ३ महिन्यांपर्यंत खोलीच्या तापमानात ठेवता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...