आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षांनंतर झाली भाडेवाढ:न्यूयॉर्क-लंडनपेक्षाही दुबईत  जास्त वाढले कार्यालयाचे भाडे

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त अरब अमिरात (यूएसई)ची आर्थिक राजधानी दुबईत सहा वर्षानंतर कार्यालयाचे भाडे वाढणे सुरू झाले, मात्र हा वाढीचा वेग न्यूयॉर्क आणि लंडनपेक्षाही जास्त आहे. खरं तर, २०१३ पर्यंत दुबईत प्रॉपर्टीचे भाव जगात सर्वात जास्त होते. कार्यालयाचा किरायादेखील न्यूयॉर्क आणि लंडनसारख्या शहरांच्या तुलनेत अधिक होते. मात्र २०१४ पेक्षा येथील रिअल इस्टेट क्षेत्रात घसरण झाली होती. कोरोना महामारीच्या काळात ही समस्या वाढली होती. आता पुन्हा एकदा दुबईत रिअल इस्टेट मार्केट रूळावर येत आहेत. एवढेच नव्हे तर जागतिक कंपन्या नवीन कार्यालय उघडत आहेत, तर मल्टीनेशनल बँक आणइ इतर व्यवसायाचाही विस्तार करत आहेत. मध्यपूर्वेतील आर्थिक-व्यावसायिक क्रियाकलापांचे केंद्र असलेल्या दुबईमध्ये २०१६ नंतर कार्यालयाचे भाडे पुन्हा वाढू लागले आहे. मधल्या काही वर्षांत ते कमी झाले होते, तरी अलिकडच्या वर्षांत अनेक उंच टॉवर बांधले गेले. यामध्ये कंपन्यांनी कार्यालये भाड्याने घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. ९२८ फूट उंच आयडीसी ब्रूक फील्ड प्लेसमध्ये १.१ दशलक्ष चौरस फूट ऑफिस आणि किरकोळ जागा आहे, त्यापैकी ९०% भाडेतत्त्वावर किंवा प्रस्तावित आहेत. भाडेकरूंमध्ये यूएसबी ग्रुप एजी, इस्रायली फिनटेक फर्म रॅपिड आणि पेर्नॉर्ड रिचर्ड सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

यूएईची आर्थिक राजधानी लंडनपेक्षाही ५ पट वाढला किराया
रिअल इस्टेट सल्लागार सीबीआरईच्या मते, प्राइम ऑफिस भाडे जूनमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ७% वाढले, तथापि ए ग्रेड ऑफिस स्पेसमध्ये ७.२%ची वाढ झाली. यामुळे लो-अँड ऑफिस स्पेसमध्ये ३% वाढ झाली. जून तिमाहीत लंडनमधील प्राइम ऑफिस स्पेसमध्ये १.४% वाढ झाली, तर न्यूयॉर्कमध्ये कमाल ३% वाढ नोंदवली गेली.

बातम्या आणखी आहेत...