आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Old Ahge | Love | If The Spouse Is Close, Even In Old Age, The Heart Beats In The Same Way, The Pattern Of Vibrations Is Also The Same Like Mental Interaction With Each Other.

दिव्य मराठी विशेष:जोडीदार जवळ असेल तर वृद्धापकाळीही एकसारखे धडकते हृदय, स्पंदनांचा पॅटर्नही असा... जणू परस्परांशी मनोमन संवाद

वृत्तसंस्था | वॉशिंग्टन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इलिनॉय विद्यापीठाचा अभ्यास : सोबत राहणाऱ्या जोडप्यांची

नाते नवे असेल तर जोडीदार जवळ राहिल्यास भावनात्मक एकात्मता येणे सामान्यच बाब. मात्र, संसारातील कित्येक उन्हाळे अनुभवल्यानंतर वृद्धापकाळातही हेच बंध कायम असतात. वृद्ध जोडपी एकत्र असल्यास त्यांच्या हृदयाची स्पंदनेही एकसमान होतात. एकमेकांच्या उपस्थितीमुळे त्यांची अंतर्मनेही जोडली जातात. त्याचा परिणाम त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांवर होतो. अमेरिकेच्या इलिनॉय विद्यापीठाच्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

अभ्यासाचे लेखक व संबंधांवर संशोधन करत असलेले डॉ. ब्रायन ओगोल्स्की म्हणाले, ‘आम्ही संबंधांतील गतिशीलता मापण्यासाठी उद्देश्यपूर्ण पद्धती शोधत होतो. प्रिय व्यक्तींच्या उपस्थितीमुळे मानसशास्त्रीय फायदे होतात हे तथ्य आधीच सर्वश्रुत आहे. यामुळे शारीरिक जवळिकीच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करता येत नाही. दोन व्यक्ती ३०-४० वर्षांपासून सोबत असणे हेच मोठी प्रतिबद्धता दाखवते.

डॉ. ओगोल्स्कीनुसार, त्यांचा भर जवळिकीची कारणे व परिणामांवर नव्हता. मात्र, जेव्हा आपला कुणी साथीदार जवळ असतो तेव्हा हृदयाची स्पंदने समकालिक पॅटर्नमध्ये चालतात हे यातून निदर्शनास आले आहे. म्हणजे दोघांच्याही हृदयाचे ठोक्यांचा पॅटर्न अशा संवादाचा संकेत देतात, जो पूर्णपणे सार्थक आहेत.

अभ्यासात समोर आले की, वयोवृद्ध जोडप्यांचा हार्टरेट लीड-लॅग संबंधांशी ताळमेळ बसवतो. यात एकत्र राहिल्यावर प्रत्येक जोडप्यापैकी एक साथीदार म्हणजेच कधी पती, तर कधी पत्नी स्पंदनांतील बदलांचे नेतृत्व करतात. हे संबंधांच्या नाजूक संतुलनाचे संकेत देतात.

अभ्यासात ६४ ते ८८ वयोगटातील दांपत्यांचा समावेश होता. त्यांनी जोडीदारासोबत १४ ते ६५ वर्षे घालवलेली आहेत. त्यांना फिटबिट सेन्सर डिव्हाइस दिली होती. तसेच जवळीक मोजण्यासाठी घराच्या चोहीकडे फिक्स्ड सेन्सर लावले होते. संशोधकांनी पती व पत्नीच्या हार्ट रेटला वेगळे व सोबत राहिल्यानंतर मॉनिटर केले. त्यांच्या दाव्यानुसार, या आधारे इतर वृद्ध दांपत्यांच्या जवळिकीचा अंदाज घेता येऊ शकतो.

प्रदीर्घ वैवाहिक आयुष्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम : तज्ज्ञ
डॉ. ओगोल्स्की म्हणाले, जोडपी जसजशी एकमेकांसोबत वृद्ध होत जातात तसतशी त्यांचे एकमेकांवरील अवलंबत्व वाढते. यामुळे ते एकमेकांच्या शारीरिक व भावनात्मक समर्थनाचे प्राथमिक स्रोत बनत जातात. प्रदीर्घ वैवाहिक आयुष्याचा दोघांच्याही आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. जवळची व्यक्ती नेहमीच फायदेशीर ठरेल असेही नाही. कारण एखाद्या वादाबाबत जवळीक ही सामान्य परिस्थितीत निकटवर्तीयापेक्षा पूर्णपणे वेगळी असू शकते.

बातम्या आणखी आहेत...