आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमा तुझा रंग कसा...:4 मुलांची माता असणाऱ्या 42 वर्षीय महिलेचे जडले लेकाच्या मित्रावर प्रेम, केला विवाह; सामाजिक टीकेला ठेंगा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका 42 वर्षीय महिलेने आपल्याच मुलाच्या 24 वर्षीय मित्राशी लग्न केल्याची अजब घटना घडली आहे. या लग्नामुळे आता या जोडप्याला सामाजिक टीकेचा सामना करावा लागत आहे. महिलेला 4 मुले आहेत. तर तिच्याशी लग्न करणारा मुलगा 24 वर्षांचा आहे.

तान्या व जोसू मागील 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यावेळी तान्या 39 वर्षांची, तर जोसू 21 वर्षांचा होता. त्यांची भेट 2018 मध्ये झाली होती. त्याचे झाले असे की, त्यावेळी तान्याच्या 12 व 14 वर्षांच्या मुलांना जोसूच्या घरी व्हिडिओ गेम खेळण्यासाठी जायचे होते. ती त्यांना सोडण्यासाठी गेली असता, तिची भेट जोसूशी झाली. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

गतवर्षी तान्या व जोसूचे लग्न झाले. स्थानिकांनी त्यांच्या संबंधांविरोधात सामाजिक सेवांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. पण त्याने या जोडप्याला काहीच फरक पडला नाही. दोघेही दररोज आपले रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. काही जण त्यावर टीकात्मक कमेंट्सही करतात.

काही जण तान्यावर जोसला मूर्ख बनवल्याचा आरोप करतात. त्यांच्या या टीकेला वैतागलेली तान्या म्हणते - 'आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा जोसू प्रौढ होता.'

जोसूलाही करावा लागतो टीकेचा सामना

तान्यावर टीका करणारे लोक जोसूवरही तोंडसूख घेतात. आपल्या डोक्यावरील छतासाठी जोसू तान्याचा वापर करत आहे. या प्रकरणी त्यांच्या मोठ्या मुलाला लज्जास्पद स्थितीचा सामना करावा लागत असेल. आपली आई जोसूची शुगर मम्मी बनल्याचे त्याला वाटत असेल, असे ते म्हणतात. तान्या व जोसूला लोकांच्या या कमेंट्सने काहीच फरक पडत नाही. ते म्हणतात, लोकांची इच्छा असो वा नसो, 'आम्ही दोघेही नेहमीच एकत्र राहू.'

'सुरुवातीला त्यांच्या मुलांना हे सर्वकाही विचित्र वाटत होते. पण आता ते ही जोसूसोबत रमलेत. जोसू त्यांच्या मुलांसाठी मोठ्या भावाहून खूप काही आहे,' असे तान्याने म्हटले आहे. 'द सन' या इंग्रजी संकेतस्थळाने इंग्लंडमधील हे वृत्त दिले आहे.