आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना ब्रिटन:ओमायक्रॉन आणीबाणी; सैन्यदलाची 42 पथके तैनात, सव्वादोन कोटी बूस्टर पुरवठा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली. १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी बूस्टर डोस मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी सव्वादोन कोटी डोस पुरवण्यात आले. सोबतच लसीकरण केंद्रांवर मिलिटरीची ४२ पथके तैनात करण्यात अली. ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी म्हटले की, कोरोनापासून बचावासाठी लसीचे दोन डोस पुरेसे नाहीत. ज्या लोकांनी दुसरा डोस घेऊन तीन महिने लोटले त्यांना या महिन्यात बुस्टर डोस दिला जाईल. परंतु बुकिंग वेबसाइट क्रॅश झाली आहे. लोकांना रांगेत तासनतास उभे राहावे लागत आहे. तिकडे अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत ८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांत तीनचतुर्थांश लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक होते. अमेरिकी रोग विशेषज्ञ डॉ. फाऊनी यांनी बूस्टर डोसचे आवाहन केले आहे.

जग : नाॅर्वेत निर्बंध वाढवले, डेन्मार्कमध्ये लस अनिवार्य
- थायलंड ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्याने दोन डोसमधील अंतर तीन महिन्यांवरून घटवून दीड महिना करण्यात आले.
- इंडोनेशिया मंगळवारपासून ६ ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांची लसीकरण मोहीम सुरू होईल. २ कोटी डोसचा पुरवठा.

लसीनंतर बाधा, संपर्कात आलेल्यांची रोज तपासणी
ब्रिटनमध्ये ऐतिहासिक पाऊल उचलले गेले. लस दिल्यानंतर कोणी संसर्गित होत असेल तर त्याच्या संपर्कातील सर्व लोकांना एक आठवड्यापर्यंत रोज तपासणी केली जाईल. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्याने मंगळवारपासून अशी तपासणी केली जाईल.

करिना कपूर आणि अमृता रावला संसर्ग
मंुबई| अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता राव कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. एका पार्टीत त्यांच्यासोबत करिश्मा कपूर आणि मलायका अरोराही होती. तिकडे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. देशात ३७,८७५ नवे रुग्ण आढळले .

पाच तास रांगेत उभे राहूनही नंबर आला नाही
- दक्षिण कोरिया बुसानमध्ये फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजीने कोरोना संसर्गितांची ओळख पटवली जाईल. निगराणी कॅमेरे लावले.
- इटली मागील २४ तासांत कोरोना संसर्गाचे १९२१५ नवे रुग्ण आढळले. ९६ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला.
- रशिया नव्या व्हेरिएंटचे आतापर्यंत १६ रुग्ण आढळले आहेत. मॉस्कोत लस न घेणाऱ्या लोकांवर सार्वजनिक ठिकाणी येण्यास बंदीची घोषणा.
- न्यूयॉर्क सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य. ७१ टक्के लोकांना लसीचे दोन डोस दिले गेलेत.

बातम्या आणखी आहेत...