आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद:चिनी लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान इम्रान यांना काेराेना

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (६७) कोरोनाबाधित झाले आहेत. आरोग्य प्रकरणातील इम्रान खान यांचे विशेष सहायक फैसल सुलतान यांनी ही माहिती दिली. इम्रान खान यांनी गुरुवारीच चीनची कोरोना लस ‘सायनाेफाॅर्म’ घेतली होती. ज्या दिवशी इम्रान खान यांनी लस घेतली त्याच दिवशी त्यांच्यात आजाराची लक्षणे दिसत होती, असे सांगण्यात येते.

सध्या त्यांनी स्वत:चे विलगीकरण करून घेतले असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. चीनकडून मिळालेल्या लसींच्या डोसद्वारे इम्रान सरकार लसीकरण कार्यक्रमही राबवत नाहीये. बहुतांश डाेस सरकार, लष्कर, उद्योगपती व राजकीय पक्षांच्या लोकांना देण्यात आले आहेत. सर्वसामान्य लोकांना कमी प्रमाणात डोस मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...