आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबान राज:एकेकाळी अफगाणमध्ये बाॅलीवूडची गाणी ऐकू येत, आता संगीतावर बंदी! वाद्ययंत्रांवर निर्बंध

काबूल16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेळीबाराचा आवाज आणि दारूगाेळा गंध. यातून अफगाणिस्तानात आता एक सन्नाटा दिसून येताे. एकेकाळी बाॅलीवूडची गाणी गल्लाेगल्ली कानी पडत. आता हाॅटेल-रेस्तराँमध्ये अफगाणी आणि पश्चिमेकडील संगीताची धूनही थांबली आहे. कारण संगीत हे गैर इस्लामी असल्याचे तालिबानी मानतात. मजार-ए-शरीफ भागात माेबाइल फाेनमध्ये गाणे डाउनलाेड करण्याचे लहान दुकान चालवणारे फहीम म्हणाले, आता लाेकांकडे मनाेरंजनाचा आधार केवळ तराणा बाकी आहे. विना संगीत असे त्याचे स्वरूप असते. त्यात बाेल महत्त्वाचे असतात. तराणा अफगाण संस्कृतीचा भाग आहे. २००१ पासून पूर्वेत तालिबान राजवटीत संगीताच्या नावाखाली तराणाला मंजुरी हाेती. तराणा संगीताचा पर्याय ठरू शकत नाही, असे अफगाण इन्स्टिट्यूट आॅफ म्युझिकचे शिक्षक परवेज निगाह यांनी सांगितले.

काबूल महिला आॅर्केस्ट्राच्या १०१ सदस्या कतारला
काबूल महिला आॅर्केस्ट्राच्या सर्व १०१ सदस्य अलीकडेच कतारला िनघून गेल्या आहेत. तालिबान राज्यात अफगाणिस्तानात राहणे त्यांच्या जीवितासाठी धाेकादायक हाेते. संगीत स्टुडिआे, थिएटर, संगीत साहित्य विक्रीच्या दुकाने तालिबानच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...