आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • One Death In 55 Seconds In The United States, 4 Million Corona Patients In The Most Affected Countries In The World ...

वॉशिंग्टन:अमेरिकेत 55 सेकंदांत एक मृत्यू, जगातील सर्वाधिक बाधित देशांत कोरोना रुग्णसंख्या 4 कोटींवर...

वॉशिंग्टन / मोहंमद अली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेल्टा व्हेरिएंटने जणू अमेरिकेला विळखा घातला आहे. अमेरिकेतील स्थिती अत्यंत वाईट दिसून येते. देशात ८ महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. डेल्टा व्हेरिएंटमुळे प्रत्येकी ५५ सेकंदांत एकाचा मृत्यू व दर मिनिटास १११ लोक संसर्गामुळे दगावू लागले आहेत. म्हणजेच अमेरिकेत दर सेकंदाला दोन रुग्ण समोर येत आहेत. ऑगस्टमध्ये महामारीच्या काळातील सर्वात भयंकर टप्पा होता. देशभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा स्फोट दिसून आला. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटींवर पोहोचली. ६.६२ लाखांहून जास्त मृत्यू झाले. देशभरातील रुग्णालयांत खाटाही शिल्लक राहिल्या नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला.

केवळ ऑगस्टमध्ये अमेरिकेत काेरोनाचे ४२ लाखांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले. मृतांची संख्या जुलैच्या तुलनेत तीनपट जास्त होती. २६ हजार ८०५ मृत्यू नोंदवण्यात आले. रिपब्लिकन राज्यांत मृतांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. हवाई, व्हेरमाँट, टेक्सास कन्सास, व्हर्जिन आयलँड अलास्का, उटा, नेवाडा, आेरेगन, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिनामध्ये २०२०च्या तुलनेत ऑगस्ट २०२१ मध्ये जास्त मृत्यू झाले आहेत. अॅरिझोना, आेक्लाहोमा, वेस्ट व्हर्जिनिया, कॅलिफोर्निया व अल्बामामध्ये हे आकडे आधीच पार झाले आहेत. अनेक जिल्ह्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यास रिपब्लिकन गव्हर्नरला जबाबदार ठरवले आहे. त्यांनी प्रतिबंधक उपाययोजना नाकारल्या. डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव होऊ दिला. रिपब्लिकन पार्टीची सत्ता असलेल्या अर्कंसास, फ्लोरिडा, लुइसियाना, मिसिसिपी, आेरेगॉन डेल्टा व्हेरिएंटचे मुख्य केंद्र बनले आहेत. देशातील एकूण कोविड-१ मधील उपचार घेणाऱ्यांपैकी पाचवा भाग फ्लोरिडात आढळून येतो.

अमेरिकेत सहा महिन्यांत लसींच्या दीड कोटी डोसचा अपव्यय
अमेरिकेत मार्चपासून आतापर्यंत लसीच्या दीड कोटीहून जास्त डोसचा अपव्यय झाला आहे. एवढ्या डोसमधून जगातील २० हून जास्त देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण झाले असते. अमेरिकेतील फार्मसी कंपन्या व राज्य सरकारकडून जारी माहितीमधून हे स्पष्ट झाले आहे.

लस कारच्या सीटबेल्टसारखी, दुर्घटना नव्हे, त्याद्वारे माणसाला होणारी हानी रोखणे शक्य
कोरोनाच्या नव्या अवताराचे संकेत भारतात उन्हाळ्यातच मिळाले होते. आज अमेरिकेत आढळून येणारे ९९ टक्के बाधित डेल्टा व्हेरिएंटचे आहेत, असे डॉ. सायरा मडाड यांचे म्हणणे आहे. सिटी हेल्थ या संस्थेत त्या वरिष्ठ संचालक आहेत. ही संस्था अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित मानली जाते. डॉ. मडाड अमेरिकेतील कोविड रिस्पॉन्स टास्क फोर्सच्या सदस्या आहेत. त्या न्यूयॉर्कमध्ये ‘कोविड टेस्ट, ट्रेस, टेक केअर प्रोग्राम’ सोबत कोविड व्हॅक्सिन कम्युनिकेशन वर्क ग्रुपच्या प्रमुखही आहेत. त्यांनी भास्करचे रितेश शुक्ल यांच्याशी केलेल्या चर्चेचा हा अंश..

संसर्ग, मृत्युदरावरून कोरोनाला फ्लूसारखे का मानले जात नाही?
आज पसरणारा विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट अल्फापेक्षा जास्त घातक आहे. सध्या जगात निम्म्याहून जास्त लोकांना लस देणे बाकी आहे. त्याला फ्लूसारखे मानता येत नाही. कारण पुढच्या काही महिन्यांत ते कोणते रूप घेईल, याची कल्पना नाही. मोसमी फ्लू हा कोरोनासारखा घातक नसतो. तो अल्पकाळ संसर्ग पसरवतो.

डोस घेतलेल्यांना संसर्ग होतोय. लसीचा परिणाम नाही असे म्हणता येईल का?
वास्तवात हर्ड इम्युनिटी वाढल्याची चर्चा आहे. लसीमुळे हे घडून आले. लसीनंतर बाधित होणे हा चर्चेचा भाग आहे. मोठा संसर्ग असलेल्या देशातील मृत्यूसंख्या कमी आहे. यावरून लस प्रभावी असल्याचे सिद्ध होते. हर्ड इम्युनिटीसाठी आरोग्य व्यवस्था चांगली असावी लागते. विना लस शरीरात रोगप्रतिकारशक्ती विकसित होण्यास जास्त वेळ लागतो. या काळात मृत्यू वाढू शकतात.

कोणत्या निकषांवर प्रभावी?
लसीमुळे संसर्ग रोखला जाईल, असा दावा कधीही केला गेला नाही. सुरुवातीला संसर्ग थांबला. तो बोनस ठरला. कारण तशी आशा वाटत नव्हती. इस्रायल, ब्रिटनसारख्या देशांत संसर्ग वाढला तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. डेल्टा व्हेरिएंटबाबत लस मृत्यू रोखत असल्याचे दिसून आले. इस्रायलमध्ये तिसरा डोस दिला जात आहे. म्हणजे सहा महिन्यांत लसीचा प्रभाव कमी होतो. दुर्लक्ष चालणार नाही. लस कारच्या सीट बेल्टासारखी आहे. ती दुर्घटना नव्हे, त्यापासूनची हानी रोखू शकते.

लहान मुलांना लस दिली जाऊ शकते?
अमेरिकेत दर आठवड्याला दोन लाख मुले कोरोनामुळे बाधित होत आहेत. मला तीन मुले आहेत. ती ८ वर्षांहून कमी वयाची आहेत. त्यांना लस देता येणार नाही. कारण मुलांवरील परीक्षण झालेले नाही. किती प्रमाणात डोस द्यावा? किती प्रभाव राहील? संशोधन सुरू आहे. मुलांसाठी लस येत नाही तोवर उपलब्ध लस देण्याची जोखीम घेऊ शकत नाही.

मुले सुरक्षित कशी करता येतील?
चांगल्या मास्कचा वापर, शाळेतील खोल्यांत पुरेशी मोकळी हवा-प्रकाश असावा. शाळेत पाणी-शौचालयाची व्यवस्था उत्तम असली पाहिजे. शिक्षक,कर्मचाऱ्यांनाही याबाबत जाणीव असावी. तेथे दुर्लक्ष होता कामा नये.

बातम्या आणखी आहेत...