आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्त्यांवर धावणाऱ्या रंगीबेरंगी गाड्यांना लोक आता कंटाळले आहेत. लंडनच्या रस्त्यांवरील प्रत्येक चौथी कार राखाडी रंगाची आहे. ज्यांची २००० ते २००९ पर्यंत क्रेझ होती त्याच रंगाच्या या कार आहेत. त्यानंतर काळ्या-पांढऱ्या आणि इतर रंगांच्या गाड्यांना पसंती दिली जाऊ लागली. सोसायटी ऑफ मोटर मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्सच्या मते, ब्रिटनमध्ये आता तोच जुना काळ पुन्हा परतत आहे. सध्या २५.७ टक्के कार राखाडी रंगांच्या आहेत. त्यानंतर याच्याशी मिळताजुळता रंग म्हणजेच काळ्या रंगाच्या २०.१% आणि पांढऱ्या रंगाच्या १६.७% कार पसंत केल्या जात आहेत. यामध्ये चांदीच्या रंगाच्या कार जोडल्यास जगभरामध्ये सध्या विक्री होत असलेल्या कारपैकी ८०% कार याच चार रंगांच्या असल्याचे दिसून येते.
आजकल कारमध्ये न्यूट्रल रंग अधिक पसंत केला जात आहे. त्यामुळेच ब्रिटनच्या रस्त्यांवर रखाडी रंगांच्या कारचा जणू पूर आलेला आहे. वस्तुत: कारचा रंग मार्केटिंगशी संबंधित आहे. कार बाजारात उतरवण्यापूर्वी कार निर्माते तिच्या रंगांवर भरपूर संशोधन करतात. इतकेच नाही तर प्रत्येक कार कंपनीच्या डिझाइन विभागामध्ये रंग तज्ज्ञ असतो. कार कंपनी ह्युंदाईमधील रंग तज्ज्ञ इवाना हरूदकोव्हा सांगतात, कारचा रंग व्यक्तिमत्त्वाचे प्रदर्शनही आहे. त्यामुळे लोक न्यूट्रल रंग अधिक पसंत करतात. १९०८ मध्ये फोर्डच्या पहिल्या कारचे लाल आणि राखाडी हे दोनच रंग होते. मात्र, फोर्ड कंपनीचे मालक हेन्री फोर्ड यांना कळाले की, काळा रंग स्वस्त असून तो दीर्घकाळ चालतो. त्यानंतर काळ्या रंगांच्या कारचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. १९५० च्या दशकात तांत्रिकदृष्ट्या कारच्या रंगांचा विकास झाला तेव्हा रंगीबेरंगी कार येण्यास सुरुवात झाली. कार कंपन्यांना रंगांचा पुरवठा करणारी कंपनी एक्झाल्टामधील मोबिलिटी टेक्नॉलॉजी मॅनेजर रेन्केस सांगतात, ज्यांचे खरेदीदार नसतात अशाच कार कंपन्या बाजारामध्ये उतरवतात. मात्र, त्या मार्केटिंगमध्ये खूप कामी येतात. पोलस्टर कंपनीच्या वरिष्ठ डिझायनर कोमल सिंह म्हणतात, लोक कारच्या रंगाच्या माध्यमातून निसर्गाशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
गडद रंगांपेक्षा न्यूट्रल रंग कधीच कंटाळवाणे नसतात कारच्या न्यूट्रल रंगाची निवड करण्याचे एक मोठे कारण म्हणजे रंगांच्या बाबतीत आवड बदलत राहते. कार १० ते २० वर्षांपर्यंत सोबत राहते. गडद रंगाने लवकर मन भरते. मात्र, न्यूट्रल रंग कंटाळवाणे नसतात. न्यूट्रल रंगाच्या कारपेक्षा इतर रंगांच्या कारचे पुनर्विक्री मूल्य ६ ते ८% पर्यंत कमी असते. न्यूट्रल रंगांच्या कारची देखभाल-दुरुस्तीही खूप सोपी असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.