आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:सावध ऐका पुढच्या हाका... भारतात कोरोना व्हायरसचा फक्त ट्रेलर; नियम पाळा, अन्यथा... 

अमेरिका3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेतून मराठमोळे डॉक्टर, पोलिसांचे आवाहन; घरातच राहा, सुरक्षित राहा प्रशासनाला सहकार्य करा

नामदेव खेडकर

अमेरिकेच्या तुलनेत भारतात सध्या कोरोनाचे अत्यंत कमी रुग्ण आहेत. भारतात आताशी खरी सुरुवात झाली आहे. भारतीय लोकांचे गांभीर्य पाहून सध्या फक्त ट्रेलर सुरू असून पिक्चर तर बाकीच आहे, असा इशारा अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असलेल्या कल्याण आसाराम घुले यांनी दिला आहे. कल्याण घुले हे मूळचे गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथील मूळ रहिवासी असून गेल्या १५ वर्षांपासून ते अमेरिकन पाेलिस विभागात आयटी इंजिनिअर म्हणून काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्थिती आणि आणि भारतीयांनी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल त्यांनी मोबाइलवरून ‘दिव्य मराठी’ला विशेष माहिती दिली.

कल्याण घुले म्हणाले, ‘गेल्या पाच आठवड्यांपासून मी, माझी बायको, दोन मुली असे चौघे घरात अगदी कोंडून आहोत. शासनाच्या आवाहनानंतर हे स्वत:हून कोंडून घेतलेले आहे. या पाच आठवड्यांत आम्ही कुणीही कुठल्याही कारणासाठी घराबाहेर पडलेलो नाही. भाजी, किराणा ऑनलाइन मिळतो. कधी मिळाले नाही तर लगेच ते आणण्यासाठी म्हणून बाहेर जात नाही. कारण एक वेळ आवडीची भाजी खाल्ली नाही म्हणून काही फरक पडत नाही. आम्ही बाहेरच निघालो नसल्याने आम्ही १०० टक्के कोरोनापासून दूर राहणार याचा मला विश्वास आहे. अमेरिकेत सध्या जवळपास चार लाख रुग्ण झाले आहेत. इथल्या सर्व मोकळ्या जागा शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. अमेरिकन सैन्यदल अवघ्या चार दिवसांमध्ये मोकळ्या जागेत रुग्णालये उभारत आहेत. नौदलांच्या जहाजांचेही रुग्णालयात रूपांतर झाले. यावरून इथे किती रुग्णालये आणि किती खाटांची आवश्यकता असेल याचा अंदाज येतो. भारतामध्ये अजून कोरोनाने तेवढे पाय रोवलेले नाहीत, पण हा आकडा वाढतच जाणार. शासनाने कितीही वेळा आवाहन केले, संचारबंदी लागू केली तरी काही लोक हे घराबाहेर फिरतातच. मी बातम्या वाचतो, बघतो. त्यातून ही माहिती कळते. पंतप्रधान मोदींनी आपापल्या घरात थाळी वाजवणे, दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्याचा लोकांनी उत्सव केला. जणू काही मोर्चा निघालाय, अशा पद्धतीने लोक या दोन्ही कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडले. हे लक्षण कोरोना थांबण्याचे नसून तो आपल्या घरात आणण्याचे आहे. भारतामध्ये दोन व्यक्तींनी एक मीटरपेक्षा अधिक अंतर ठेवायला शासनाने सांगितले आहे. आमच्याकडे मात्र सहा फुटांचे अंतर सांगितले आहे.’

नियोजित कामे रद्द करा, घरातून जे शक्य होईल तेच करा...

संचारबंदीतही फिरणे, गर्दी करणे जर असेच सुरू राहिले तर उपचाराअभावी रस्त्यात, घरात, रुग्णालयाच्या दारात भयंकर स्थिती उद्भवू शकते. आपल्याकडे जर रुग्णसंख्या वाढतच राहिली तर उपचार कुणावर, कुठे आणि कोण करणार? त्यामुळे ज्याला जगायचे आहे त्याने स्वत:हून घराबाहेर फिरणे बंद करा. जर घराबाहेर गेलो नाही तर मरेन, अशी स्थिती निर्माण झाली तरच घराबाहेर पडा. सांगण्याचा उद्देश हाच आहे की भाजी, फळे, किराणा आणण्यासाठीसुद्धा बाहेर पडू नका. घरात असेल त्यावर भागवा. भाज्यांसाठी पर्याय शोधा. नियोजित कामे रद्द करा. घरून जे शक्य होईल ते करत राहा.

बातम्या आणखी आहेत...