आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसिसिपीत फूड फेस्टिव्हलमध्ये गोळीबार:अमेरिकेत 'मे दिना'च्या सोहळ्यात अंदाधूंद गोळीबार, 1 जण ठार, 5 जखमी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील मिसिसिपी शहरामध्ये एका फूड फेस्टिवलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे फेस्टिवल 27 एप्रिल ते 1 मेपर्यंत चालणार होते.

गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच स्थानिक पोलिस मिसिसिपीमध्ये दाखल झाले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 1 मेच्या आनंदात लोक तेथे आनंदोत्सव साजरा करत असताना ही घटना घडली. या घटनेत अनेक गुन्हेगार सामील होते, त्यांचा तपास सुरू आहे,असे ऑफिसर टाइरी जोन्स यांनी सांगितले.

हा गोळीबार परस्पर वैमनस्यातून झाला की काही हिंसक घटना, याचा तपास पोलीस करत आहेत.
हा गोळीबार परस्पर वैमनस्यातून झाला की काही हिंसक घटना, याचा तपास पोलीस करत आहेत.
मिसिसिपीमध्ये दरवर्षी हा महोत्सव भरवला जातो. या वर्षीची थीम होती फूड मेकिंग.
मिसिसिपीमध्ये दरवर्षी हा महोत्सव भरवला जातो. या वर्षीची थीम होती फूड मेकिंग.
गुन्हेगार मोठ्या संख्येने आले होते, जे घटनेनंतर आसपासच्या परिसरात लपले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हेगार मोठ्या संख्येने आले होते, जे घटनेनंतर आसपासच्या परिसरात लपले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोळीबारानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. लोकांना त्यांच्या घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.
गोळीबारानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. लोकांना त्यांच्या घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर तपासासाठी उच्चस्तरीय पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक आजूबाजूच्या परिसरात सतत छापे टाकत आहे.
या घटनेनंतर तपासासाठी उच्चस्तरीय पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक आजूबाजूच्या परिसरात सतत छापे टाकत आहे.
बातम्या आणखी आहेत...