आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • One Killed In Yunnan Province With Hanta Virus, 24% More Likely To Die In This Infection Than Corona

चीनमध्ये नवीन व्हायरसचे आगमन : 'हंता' व्हायरसमुळे युनान राज्यात एकाचा मृत्यू, कोरोनापेक्षा 24 % जास्त धोकादायक

china6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याची शक्यता 14%, हंतामुळे मृत्यू होण्याची शक्यता 38%
  • कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 4 लाख संक्रमित, 15 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

बीजिंग- जगभरात 15 हजारांपेक्षा जास्त बळी घेतलेल्या कोरोना व्हायरसचा धोका अजून टळला नाही. हा व्हायरस जगभरात पसरत आहे, यातच आता चीनमध्ये एक नवीन व्हायरस आला आहे. चीनच्या युनान राज्यात बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चीनी मीडिया ग्लोबल टाइम्सच्या माहितीनुसार, हा मृत्यू 'हंता' व्हायरसमुळे झाला आहे. काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे की, हंता व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका कोरोना व्हायरसपेक्षा 24% जास्त आहे. ग्लोबल टाइम्सने सांगितले की, युनानवरुन शेंगडॉन्गला जात असलेल्या व्यक्तीचा मृत्यू हंता व्हायरसमुळेच झाला आहे. त्या बसमध्ये इतर 32 प्रवासी होती, सध्या त्या सर्वांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

हंता व्हायरस नवीन आव्हान: जाणून घ्या व्हायरसबद्दल माहिती

हंता व्हायरस कसा पसरतो?

चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (सीडीसी) ने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस उंदरांमधून पसरतो. हा व्हायरस हवेमधून पसरत नाही. हा त्याच लोकांना आपल्या विळख्यात घेतो, जे उंदरांचे मल-मूत्र, सलाइवा यांच्या संपर्कात येतात.

याची लक्षणे काय आहेत ?

या व्हायरसची लागण झाल्यावर कमजोरी, ताप, मांसपेश्यांमध्ये दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे, सर्दी आणि पोटाचे विकार होतात.

लक्षणे आढळल्यानंतर पुढील टप्प्यात काय होईल ?

लक्षणे आढळल्यानंतर संक्रमित व्यक्तीवर उपचार न केल्यास, त्याला ब्लडप्रेशर, अटॅक,  किडनी फेल होण्याचा धोका आहे.

सध्या किती जणांना लागण?

रिपोर्ट्सनुसार, चीनच्या ग्रामीण भागात उंदरांची संख्या जास्त असल्यामुळे, तिथे हा व्हायरस पसरण्याचा धोका आहे. याशिवाय कॅम्पर्स आणि हायकर्सदेखील या व्हायरसच्या विळख्यात येऊ शकतात.

कोरोनापेक्षा किती जास्त धोका?

जगभरात कोरोना व्हायरसमुळे 15 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच 4 लाख लोक संक्रमित झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 14% आहे आणि हंता व्हायरसमध्ये 38% आहे. म्हणजेच, हंता व्हायरसमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण 24 % आहे.

बचावासाठी चीन काय पाउल उचलणार ?

सीडीएसने सांगितले की, सुरुवातील आम्ही फक्त उंदरांची संख्या कमी करण्यावर भर देत आहोत. 

0