आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीचा राष्ट्रवाद:प्रत्येकी तीनपैकी एका व्यक्तीला सर्वात आधी स्वत:साठी हवी लस; 60% लाेक म्हणतात, समान वाटप करा

ओस्लो4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि विकास केंद्राने 137 देशांतील लाेकांचे मत जाणून घेतले

जगभरात काेराेना लस विकसित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. परंतु काही विकसित देशांना ही लस आधी स्वत:ला हवी आहे. संयुक्त राष्ट्राने काेराेना लस निर्मिती व वितरित करण्यासाठी १५० हून जास्त देशांची आघाडी तयार केली आहे. त्याला काेवॅक्स असे नाव देण्यात आले आहे. मतभेदांमुळे ट्रम्प प्रशासनाने काेवॅक्समध्ये सहभागी हाेण्यास नकार दिला. रशियानेदेखील या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीन या गटातून बाहेर हाेता. परंतु ९ आॅक्टाेबर राेजी चीनने या गटात सहभागी झाल्याचे जाहीर केले.

काेवॅक्समधून बाहेर पडलेल्या देशांना स्वत:ची काळजी आहे. त्यांना लस आधी स्वत:ला हवी आहे. त्यामागे खरे कारण लसीचे वितरण हे आहे. जागतिक आराेग्य संघटनेचे संचालक टेड्राेस घेब्रेयेसस म्हणाले, लसीचा राष्ट्रवाद आपली पीछेहाट करेल. काही देशांना काेराेनामुक्त करणे व इतरांना वेगाने पसरणाऱ्या काेराेनासाेबत एकटे साेडून देणे याेग्य हाेणार नाही. अशा पद्धतीमुळे महामारीचा काळ आणखी वाढेल. एका पाहणीनुसार लसीचा लाभ आधी मला मिळावा अशी विकसित देशांतील प्रत्येकी तीनपैकी एका व्यक्तीची इच्छा आहे.

संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय सुरक्षा व विकास केंद्राच्या एका संशाेधनपर गटाने मार्च ते सप्टेंबरदरम्यान काेराेनासंबंधी एक पाहणी केली. त्यात १३७ देशांतील ११ हजार ६०० लाेकांशी प्रश्नाेत्तरे करण्यात आली. उत्तरादाखल प्रत्येकी तीनपैकी एकाने सर्वात आधी देेशासाठी लसीची मागणी केली. ६० टक्क्यांहून जास्त लाेकांनी जगभरात लसीच्या वाटपाचे समर्थन केले. लसीबद्दलचा स्वार्थी दृष्टिकाेन बहुतांश प्रगत देशांत सर्रासपणे पाहायला मिळाला. ब्राझील, फिनलंड आणि पाेर्तुगालमध्ये ४० टक्क्यांहून जास्त लाेकांना लसीची हमखास उपलब्धता हवी आहे.

पाहणीत सर्वाधिक स्वार्थी दृष्टिकाेन अमेरिकींचा दिसून आला. आम्हालाच सर्वात आधी लस मिळाली पाहिजे, असे ४६ टक्के अमेरिकींचे मत आहे. जर्मनीत उत्तरदात्या ६९ टक्के लाेकांनी प्राधान्यक्रमानुसार लसीचे वितरण व्हायला हवे, अशी भूमिका मांडली. अमेरिका, ब्रिटन, रशियात ७५ टक्के लाेकांना लस मिळावी, असे वाटते. तूर्त तरी लसीचा शाेध व त्याच्या वितरणावरून तणातणी सुरू आहे. कोरोनावर प्रभावी लस शोधण्यासाठी जगभरात अनेक संशोधक सातत्याने प्रयत्न करत आहेत. विविध प्रयोग वेगवेगळ्या टप्प्यांत असून वर्षाखेरीस किंवा पुढल्या वर्षीच्या सुरूवातीला लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser