आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Onika Took The Help Of Books To End Apartheid; Whites And Blacks Now Sit Together In The Human Library!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:ओनिकाने वर्णभेद संपवण्यासाठी घेतली पुस्तकांची मदत; ह्यूमन लायब्ररीत आता गोरे-कृष्णवर्णीय बसतात एकत्र!

टुल्सा सिटी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत कृष्णवर्णीयांचे विरोधकही ओनिका यांच्या मोहिमेत सहभागी, तरूणांमध्ये लोकप्रिय

अमेरिकेत श्वेत व कृष्णवर्णीय यांच्यातील मतभेद ही एक मोठी समस्या आहे. अलीकडेच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत या मुद्द्याने सरकारच बदलून टाकले. यादरम्यान ओनिका असामोवा सीजर यांनी वर्णभेद संपवण्यासाठी पुस्तकांची मदत घेतली आणि ओकलाहोमाच्या टुल्सा शहरात ह्यूमन लायब्ररी सुरू केली. त्याला ‘फुल्टन स्ट्रीट बुक्स अँड कॉफ बुक स्टोअर’ असे नाव दिले. हे ठिकाण सुरुवातीला कृष्णवर्णीयांसाठी होते, परंतु आता येथे श्वेतवर्णीय लोकही येतात. एवढेच नव्हे तर बुक स्टोअरचा परिणामही दिसू लागला आहे. श्वेत-कृष्णवर्णीय यांच्यातील दरीदेखील कमी होत चालली आहे. कालपर्यंत कृष्णवर्णीयांचा तीव्र विरोध करणारे लोकही आता स्टोअरमध्ये रमलेले दिसतात. ओनिका जॉन हाफकिन्स विद्यापीठातील पदवीधर आहेत.

बुक स्टोअर सुरू करण्यापूर्वी त्या कोलाराडो सिनेटच्या धोरआसंबंधी सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. वास्तविक ओनिका पूर्वाश्रमीच्या शाळेतील शिक्षिका. ओनिका म्हणाल्या, परिस्थिती सर्वांनी स्वीकारावी, अशी परिस्थिती निर्माण करण्याची माझी इच्छा होती.

टुल्सा शहरात कृष्णवर्णीयांची संख्या जास्त आहे. येथे शिक्षणाची परंपरा कमकुवत आहे. वर्णभेदावरून दररोज काही ना काही बखेडा असायचा. कोविडदरम्यान तर अशा घटनांत वाढ झाली. त्यानंतर ह्यूमन लायब्ररीचे काम सुरू केले. श्वेत तसेच कृष्णवर्णीयांनी शिक्षण घ्यावे. अनुभवी लोकांच्या सान्निध्यात बसून समाजातील समस्यांचा ऊहापोह करावा, पुस्तकावर आधारित चर्चा करावी, असा त्यामागील उद्देश होता. त्यातून विचारांची देवाण-घेवाण होते.

ओनिका यांच्या पुढाकारामुळे टुल्सा शहरात वाचनाबद्दलची जागरुकता वाढली आहे. १८ ते २५ वयोगटात ओनिका लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातही मानसिक आजार असलेल्या लोकांना ह्यूमन लायब्ररीने आकर्षित केले आहे. आपल्याला हवा तसा बदल आपण पुस्तकाच्या माध्यमातून समाजात घडवून आणता येऊ शकतो, असे मला वाटते. कोरोनाने सर्व प्रकारच्या फिरण्यावर जणू बंदी घातली हो ती. परंतु त्याच काळात संवेदशनील श्वेत वर्णीय लोकांनी माझ्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. वर्णभेदाच्या समस्येच्या उच्चाटनासाठी आपल्या परीने योगदान देण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

कॉफीचा आस्वाद घेत आत्म्याला हलवून सोडणारी पुस्तके आणि ही जिवंत माणसे हीच माझी खरी कमाई आहे. खरे तर ही केवळ सुरुवात असल्याचे ओनिका सांगतात. त्यांच्या प्रयत्नामुळे अमेरिकेत अनेक सकारात्मक चर्चाही सुरू झाली आहे. ओनिकांनी यांच्या कल्पनेमुळे अनेकांच्या आयुष्याला बहर आला असे म्हणता येईल.

कृष्णवर्णीयांच्या आयुष्यात बदल घडवला...

लहानपणापासूनच माझ्या रंगावरून मला अनेक गोष्टी आणि शिव्याही एेकाव्या लागल्या. अशा परिस्थितीत राहून श्वास घेणे माझ्यासाठी गरजेचे नाही. म्हणूनच परिवर्तन घडवण्यासाठी माझ्याकडे पुस्तके व सुशिक्षित लोकांशिवाय अन्य पर्याय नव्हता. पुढे समजूतदार लोकांसोबत कॉफी पीत पुस्तकांवर चर्चा केल्यास जीवनात बदल नक्की होईल, असे वाटू लागले. माझ्या बुक स्टोअरने केवळ माझ्याच नव्हे, तर अनेक कृष्णवर्णीयांच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. या बदलात गोऱ्यांचेही सहकार्य मिळू लागल्याचे समाधान आहे.

बातम्या आणखी आहेत...