आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानमध्ये २४ मार्च २०२० पर्यंत कोरोनाचे एकूण रुग्ण १२०० होते. ४३ जणांचा मृत्यू झाला होता. आता जपानमध्ये बाधितांची संख्या ६ लाख १६ हजार १२३ झाली आहे, तर १० हजार ५१७ मृत्युमुखी पडले आहेत. २०२० मध्ये जपान सरकारने मार्चअखेरीस सुटीच्या दोन आठवडे आधीच शाळांना सुटी जाहीर केली होती. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांचेही आयोजन रद्द केले होते. नोकरदार लोकांनीदेखील घरून काम करण्यास प्राधान्य दिले. त्याशिवाय जपानी संस्कृतीनुसार लोक भेटल्यानंतर परस्परांना पुढे झुकून अभिवादन करतात. त्यामुळे संसर्गाचा वेग खूप कमी राहिला. रुग्णसंख्येत मात्र विरोधाभास दिसतो.
व्हायरोलॉजिस्ट मासाहिरो कामी म्हणाले, देशात चाचण्या खूप कमी आहेत. सरकारचे लक्ष पूल टेस्टिंगकडे आहे. आतापर्यंत आरटीपीसीआर तपासण्याही वाढलेल्या नाहीत. त्यामुळे खऱ्या रुग्णांची माहिती मिळत नाही. म्हणूनच असे अनेक रुग्ण असतील. जपानमध्ये अतिशय मंद गतीने लसीकरण होत आहे. जपानची लोकसंख्या १२.६३ कोटी आहे. परंतु ब्लूमबर्ग व्हॅक्सिन ट्रॅकरनुसार तेथे २ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. सरकारसमोर अनेक प्रकारची आव्हाने आता समोर येत आहेत. देशातील तज्ञांनी देखील सरकारला योग्य निर्णय घेण्याचे सूचवले आहे.
ऑलिम्पिकसाठी धोरणांची आखणी, पण घराघरात लोक प्राण गमावताहेत
ऑनलाइन याचिकेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी संबोधित केले. बाक हिरोशिमामध्ये १७ मे रोजी ऑलिम्पिक मशाल रिलेच्या समारोपप्रसंगी उपस्थित राहतील. याचिकेला केंजी उत्सुनोमियांनी तयार केले होते. त्यांनी टोकियोच्या गव्हर्नर पदाची निवडणूक लढवली आहे. सरकारची सगळी धोरणे ऑलिम्पिकला केंद्रस्थानी ठेवून तयार होत आहेत. वास्तविक कोरोनाचा फैलाव राेखण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रुग्णालयांत उपचारासाठी जागा राहिलेली नाही. घराघरात लोक प्राण गमावत आहेत, असे केंजी यांनी म्हटले आहे.
भारत, पाकिस्तानमधून येणाऱ्यांना बंदीची जपानची तयारी
भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घालण्याची जपान तयारी करत आहे. आता भारतातून जपानला गेलेल्या लोकांना १४ दिवसांसाठी क्वाॅरंटाइन केले जात आहे. मात्र सध्या जपानच्या नागरिकांव्यतिरिक्त कुणालाही देशात प्रवेश दिला जाणार नाही. अशाच प्रकारे पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशवरही ट्रॅव्हल बॅन लागू शकतो. कारण या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत. २६ एप्रिलला जपानमध्ये भारतीय विषाणूच्या प्रतिरूपाने बाधित २१ जण आढळून आले होते. त्यास पुष्टीही मिळाली होती. त्यापैकी एक रुग्ण स्थानिक होता. परंतु त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती.
वाढत्या रुग्णांवर निगराणी
आरोग्य खात्याचे तज्ज्ञ म्हणाले, व्यापक पातळीवर तपासणी करण्याऐवजी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर निगराणी ठेवण्यात आली. टोकियो विद्यापीठातील जर्मन तज्ज्ञ सेबास्टियान मासलोव म्हणाले, कमी संख्येची तपासणी व्हायला हवी होती. त्यातून संसर्गाच्या गंभीर स्थितीसाठी सज्ज होता आले असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.