आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाओमी कोशी यांनी जुनी गोष्ट सांगितली. २०१६च्या महापौर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्या रेल्वे स्थानकाबाहेर लोकांच्या भेटीगाठी घेत होत्या. इतक्यात एक म्हातारा माणूस आला आणि तो लाथ मारून बोलला की महिलांच्या तुलनेत तुम्ही खूप शक्तिमान आहात. ते ऐकून नाओमीला धक्काच बसला. त्या यापूर्वी सर्वात तरुण महिला महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूकही जिंकली. त्या स्पष्ट म्हणाल्या, मला वाटते, लोक शक्तिशाली स्त्रियांचा तिरस्कार करतात. यातून जपानच्या अर्ध्या लोकसंख्येच्या विचारसरणीची झलक दिसून येते. आणि नाओमीने स्थिती बदलण्याचा निर्धार केला. मोठ्या कंपन्यांच्या बोर्डात महिलांना स्थान मिळावे यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे.
जपान ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, त्याची लोकसंख्या कमी होत आहे. अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. कुटुंबाचे उत्पन्न घटले आहे. २०२१मध्ये निवडून आलेले पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी आर्थिक विकासाला गती देण्याचे आणि वेतन वाढवण्याचे आश्वासन दिले; परंतु ते कसे करतील हे स्पष्ट नाही. वकील नाओमी म्हणते की या समस्येचे मूळ म्हणजे व्यवसायात जपानी महिलांचे कमी प्रतिनिधित्व आहे. केवळ ८% स्त्रिया कंपन्यांच्या बोर्ड सदस्य आणि १५% पेक्षा कमी व्यवस्थापनात आहे. जगातील श्रीमंत देशांमध्ये हा दर सर्वात कमी आहे. यूएसमधील एसअँडपी ५०० कंपन्यांच्या ३०% संचालक महिला आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये जपान १५६ देशांपैकी १२० व्या क्रमांकावर आहे. गोल्डमन सॅक्स बँकेच्या अहवालात असे नमूद केले आहे की रोजगारामध्ये महिलांच्या उपस्थितीतील अंतर कमी झाल्यास जपानच्या जीडीपीमध्ये १०% वाढ होऊ शकते. महिलांचे कामाचे तास वाढल्याने १५% वाढ शक्य आहे. आता जपानची आघाडीची व्यावसायिक संघटना कीडानरेने २०३० पर्यंत ३०% स्त्रिया बोर्ड सदस्य आणि कंपनी अधिकारी म्हणून घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नाओमी म्हणते की जपानी कंपन्या आणि अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत नाही याचे एक कारण म्हणजे ३० वर्षांपासूनची जुनी पद्धत. महिला, तरुण, परदेशी, समलैंगिकांना जागा द्यावी लागेल. त्यामुळे गेल्या वर्षी नाओमीने काओरू मत्सुजावा या अन्य वकिलासोबत ऑनबोर्ड कंपनी स्थापन केली. ते महिलांना प्रशिक्षण देतात आणि त्यांना जपानमधील कंपन्यांच्या मंडळावर नियुक्त केले जाते. कंपनीने आतापर्यंत २३०हून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे. नाओमी स्वतः सॉफ्टबँक कॉर्पोरेशन आणि टेलिकम्युनिकेशन कंपनी व्ही-क्यूबच्या बोर्डवर आहे. त्या दोनदा ओत्सू शहराच्या महापौर राहिल्या आहेत. आतापर्यंत ऑनबोर्ड २९ कंपन्यांमध्ये १६० महिलांना पाठवण्यात आले आहे.
महिलांच्या अनादराची संस्कृती
जपानमध्ये महिलांना मूल किंवा नोकरी यापैकी एकाची निवड करावी लागते. जपानमधील पुरुष इतर कोणत्याही श्रीमंत देशांपेक्षा खूपच कमी घरगुती काम करतात. टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख योशिरो मोरी यांच्या गेल्या वर्षीच्या विधानावरूनही महिलांबद्दलचा जपानी दृष्टिकोन समजू शकतो. ते म्हणाले होते, महिला सभांमध्ये खूप बोलतात.कंपन्यांच्या संचालक मंडळावर महिलांची संख्या वाढवली तर त्यांच्या बोलण्याच्या वेळेवर बंधने घालावी लागतील. २०१८मध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते कोइची हागिउडा म्हणाले, मुलांचे संगोपन करणे हे महिलांचे काम आहे. आता ते अर्थव्यवस्था, उद्योग आणि व्यापार मंत्री आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.