आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज स्वस्थनी माता पर्व समारोप:फक्त नेपाळमध्येच स्वस्थनी मातेच्या कथेची हिंदू परंपरा; महिनाभर कथा वाचतात भाविक

काठमांडू/अभयराज जाेशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळची राजधानी काठमांडूनजीक शांखू भागात स्वस्थनी मातेचा महिनाभराच्या उत्सवाची रविवारी सांगता होत आहे. विशेष म्हणजे, एक हिंदू परंपरा असतानाही हा भारतात नाही. केवळ नेपाळमध्ये हे पर्व साजरे होते.हिंदी कॅलेंडरच्या पौष महिन्याच्या पौर्णिमेला ६ जानेवारीला उत्सव सुरू होताच एका या छोट्याशा भागातील वातावरण भक्तिमय होते. संपूर्ण नेपाळहून भाविक येथे येतात. याशिवाय अनेक भाविक येथे येऊ शकत नसतील तर ते महिनाभर स्वस्थनी मातेच्या कथेचे वाचन करतात. कथेनुसार, या पर्वादरम्यान शांखूच्या शाली नदीत स्नान केल्याने पापमुक्त होते.

नेपाळच्या परंपरांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक जेसिका वेंटाइन बर्केनहोल्ज म्हणाल्या,१५७३ मध्ये राजा जयंत देव यांच्या शासन काळात कथेला सुरुवात झाल्याची शक्यता आहे. कथेचा मूळ पाठ काठमांडू खोऱ्यातील मूळ रहिवाशांनी नेपाळीत लिहिला होता. यानंतर याचे आजच्या नेपाळीत भाषांतर झाले. त्यात कालानुरूप बदल होत गेले.

बातम्या आणखी आहेत...