आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी वर्चस्वानंतर उपासमारी:अफगाणिस्तानात केवळ एक महिन्याचे अन्नधान्य शिल्लक : संयुक्त राष्ट्र

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानवर तालिबानने वर्चस्व निर्माण केल्यानंतर देश उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. सुमारे ४ कोटी लोकसंख्येवर अन्नान्न करण्याची वेळ आहे. याबद्दल संयुक्त राष्ट्राने इशारा दिला आहे. अफगाणिस्तानात एक महिना पुरेल एवढे खाद्यान्न शिल्लक आहे. अगोदरच संकटात असलेल्या अफगाणिस्तानातील लोकांसमोर दोन वेळच्या जेवणाचे संकट आले आहे. एवढे रेशन उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ २० कोटी डॉलर (सुमारे १४६१ कोटी रुपये) रकमेची गरज भासणार आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय समुदायाने अन्न उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ ठोस पावले उचलण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले आहे.

संयुक्त राष्ट्राचे विशेष उपप्रतिनिधी अलकबारोव्ह गुरूवारी म्हणाले, युद्धात होरपळलेले एक तृतीयांश लाेक दररोज भोजन मिळेल की नाही, हे सांगू शकत नाहीत. काबूलमध्ये एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत याबाबत इशारा देण्यात आला. जागतिक खाद्य कार्यक्रमा अंतर्गत अफगाणिस्तानात आलेले अन्नधान्य सप्टेंबरपर्यत उपलब्ध होईल. त्यानंतर संपूर्ण साठा संपेल. अफगाणिस्तानातील लोकांना खाद्य वस्तूंचा पुरवठा करू शकणार नाही.

६ लाखांहून जास्त अफगाणी बेघर
संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानातील पीडित मुलांबद्दल सर्वाधिक चिंता व्यक्त केली आहे. देशातील निम्म्यांहून जास्त मुले ५ वर्षांहून कमी वयाची आहेत. त्यातही कुपोषितांची संख्या जास्त आहे. अशा मुलांवर तर उपासमारीची वेळ येईल. सहा लाखांहून जास्त अफगाणी बेघर झाले आहेत. पाकिस्तानची सीमा पार करून ट्रकांच्या साह्याने सुमारे ६०० मेट्रिक टन खाद्यान्न अफगाणिस्तानला पाठवण्यात आले होते. काबूल विमानतळावरील ८०० मुलांना खाणे-पिण्याची व्यवस्था आहे.

बातम्या आणखी आहेत...