आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकच्या नॅश्नल असेंब्लीतील धक्कादायक घटनाक्रमात इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी इम्रान यांच्यावर संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तर पीएमएल-एन नेत्या तथा माजी पंतप्रधान नवाज शरीफ याच्या कन्या मरियम शरीफ यांनी इम्रान हे वेडसर व्यक्ती असल्याचा आरोप केला आहे.
विरोधकांचे संसदेत धरणे
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते बिलावल भुट्टो यांनी विरोधकांच्या आघाडीने इम्रान सरकारविरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्तावावर मतदान होईपर्यंत संसदेत धरणे देण्याची घोषणा केली आहे. इम्रान सरकारने संविधानाचे उल्लंघन केले. नॅश्नल असेंब्लीचे उपसभाती कासिम सुरी यांनी अविश्वास ठरारावर मतदान घेण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे विरोधकांनी संसदेत धरणे देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे वकील सर्वोच्च न्यायालयात जात आहेत. आम्ही सर्वच संस्थांना पाकच्या संविधानाचे संरक्षण, जतन व ते कायम राखण्याचे आवाहन करत आहोत, असे भुट्टो यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विरोधकांकडे बहुमत असल्याचाही दावा केला. सभापतींनी अखेरच्या क्षणी अवैध पाऊल उचलले. यामुळे पाकच्या कायद्याची अवहेलना झाली. कायद्यानुसार अविश्वास प्रस्तावर आजच मतदान झाले पाहिजे, असे ते म्हणाले. संसद भंग करता येत नाही. सरकारला अविश्वास ठरावाचा सामना करावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.
मरियम शरीफही भडकल्या
दुसरीकडे, पाकिस्तान मुस्लिम लिग-नवाज (पीएमएल-एन) पक्षाच्या नेत्या मरियम शरीफ यांनीही या प्रकरणी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तिखट निशाणा साधला आहे. त्यांनी इम्रान हे वेडसर व्यक्ती असल्याचा आरोप केला आहे. इम्रान वेडसर व्यक्ती आहेत. त्यांना शिक्षा मिळाली नाही तर पाकमध्ये जंगलराज अवतरेल. कुणालाही संविधानाचे उल्लंघन करण्याची परवानगी नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.