आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 रोजी मतदान:ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकीत चीन-महागाई मुद्दा, स्कॉट अडचणीत , पंतप्रधान स्कॉट यांना विरोधी लेबर पक्षाकडून आव्हान

ऑस्ट्रेलिया25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. २१ मे रोजी ऑस्ट्रेलियाचे लोक नवे सरकार निवडतील. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा लिबरल पक्ष आणि मित्रपक्ष लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. स्कॉट मॉरिसनविरोधात लेबर पक्षाचे उमेदवार अँथोनी अल्बनेसी आहेत. दोन्ही मोठे पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यंदा ऑस्ट्रेलियन निवडणुकीत महागाई आणि चीन सर्वात मोठे मुद्दे आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. मालमत्तेचे दरही जवळपास ४० टक्क्यांनी वाढले आहेत. लोकांसाठी घर खरेदी करणे कठीण झाले आहे. गेल्या दोन वर्षांत लोकांचे वेतन २ टक्क्यांनी वाढले आहे. पीएम स्कॉट सुरक्षेला मुद्दा बनवत प्रचार सभांमध्ये चीनविरोधात वातावरण तयार करत आहेत. विरोधी लेबर पक्षाला चीन आर्थिक मदत करत असल्याचा आरोप मॉरिसन यांचा लिबरल पक्ष करत आहे. यंदा मॉरिसन यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

कोरोना काळापासून बेरोजगारी, व्याजदर वाढल्याने लोक नाराज
कोरोनाकाळात ऑस्ट्रेलियात लाखो लोकांनी रोजगार गमावला. तसेच सेंट्रल बँकेने ३ मे रोजीच व्याजदर ०.३५% केला. एका दशकापासून जास्त काळानंतर व्याजदर वाढले. लोक यामुळे नाराज आहेत. २००७ मध्ये व्याजदर वाढवल्याने पीएम हाॅवर्ड पराभूत झाले होते. याबाबत विचारले असता सरकारला धोका नसल्याचे मॉरिसन म्हणाले.

क्वॉड संघटनेच्या नावाखाली सुरक्षेची हमी देत आहेत स्कॉट
ऑस्ट्रेलियाच्या प्रशांत महासागर क्षेत्रातील सोलोमन बेट चीनशी जवळीक करत आहेत. अशा वे‌ळी मॉरिसन लोकांना ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका व जपानच्या क्वॉड संघटनेचा हवाला देत सुरक्षेची हमी देत आहेत, तर लेबर पक्षाचे अल्बनेसी प्रचार सभांमध्ये समर्थन किंवा विरोधी पक्षाकडून कोणतेच थेट वक्तव्य करताना दिसत नाहीत.

5.1 टक्के महागाईचा दर, मागील ३२ वर्षांमध्ये सर्वात जास्त 2.0 टक्के दरानेच लोकांच्या वेतनात वाढ, यामुळे लोकांमध्ये रोष

भारत : कोणतेही सरकार येवो, दोन्ही देशांतील संबंध मजबूत
ऑस्ट्रेलियातील भारतीय जाणकार नताशा झा सांगतात, पंतप्रदान नरेंद्र मोदी आिण स्कॉट मॉरिसन यांच्यातील घट्ट मैत्रीमुळे दोन्ही देशांत अनेक ऐतिहासिक करार झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल निवडणुकांत कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी वैश्विक अस्थिरतेदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियातील नाते आगामी काळात आणखी मजबूत होत जातील.

बातम्या आणखी आहेत...