आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिएटल, लॉस एंजलिस, न्यूयॉर्कच्या चायनाटाऊन, सिलिकॉन व्हॅली व आता अटलांटा येथे वांशिक हिंसाचाराच्या घटना झाल्या. त्याच्या निषेधार्थ अमेरिकेत निदर्शने होत आहेत. अमेरिकेत चीन, तैवान, व्हिएतनाम, लाआेस, हाँगकाँग, मकाऊसारख्या आशियातील देशांच्या लोकांवर द्वेषातून हल्ल्यांच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. अटलांटामध्ये बुधवारी तीन मसाज पार्लरमध्ये ६ कोरियाई नागरिकांसह ८ जणांची हत्या झाल्याने अमेरिकेत राहणाऱ्या आशियाई वंशाच्या लोकांमध्ये दु:ख व दहशत दिसून येते. या घटनेच्या विरोधात वॉशिंग्टनच्या चायनाटाऊनमध्ये राहणाऱ्या चीन, तैवान, व्हिएतनाम व इतर देशांतील नागरिकांनी रॅली काढली आणि वांशिक हल्ल्यांचा निषेध केला. अटलांटा, न्यूयॉर्कसह सहा शहरांत अशा लोक हिंसाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. हल्ल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांनी गस्तदेखील वाढवली आहे. दोन महिन्यांत गुन्हेगारीत प्रचंड वाढ : कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार चीन, तैवान, लाआेस, हाँगकाँग, मकाऊ, फिलिपाइन्स देशांतील लोकांच्या विरोधात द्वेष व हिंसाचाराच्या घटनांत १५० पटीने वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत आशियातील नागरिकांवर ५०० हून जास्त हल्ले झाले. गेल्या एक वर्षात हल्ल्याच्या ३८०० घटना घडल्या.
हल्ले का : ट्रम्प, श्वेत वर्चस्ववाद
तज्ञांच्या म्हणण्यानुसार हिंसाचार वाढण्यामागे ट्रम्प यांची राष्ट्रवादी वागणूक, श्वेत वर्चस्ववाद आणि कोरोनासाठी चीनला जबाबदार ठरवणे इत्यादी गोष्टी कारणीभूत मानल्या जातात. ट्रम्प यांनी श्वेत वर्चस्ववादाला प्रोत्साहन दिले. ते घातक ठरले. चीन, तैवानसह आशिया-प्रशांत देशांतील लोकांनी वॉशिंग्टनच्या चायनाटाऊन ते कन्व्हेन्शन सेंटरपर्यंत रॅली काढली. १३ मार्च व २ मार्च रोजीही हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने झाली होती.
दबाव : एफबीआयची निष्क्रियता
आशियातील लोकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत अमेरिकेतील केंद्रीय तपास संस्था एफबीआयवर दबाव वाढला. हल्ले रोखण्यासाठी संस्थेला काही उपाय सापडलेले नाहीत. त्याशिवाय रिपाेर्टिंगच्या पातळीवरही एफबीआयवर टीका केली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.