आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:जगात सर्वात जास्त बाधित असलेल्या अमेरिकेत मास्कला होतोय विरोध; जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याने अधिकारी सोडत आहेत नोकरी

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य विभागाची विनंती धुडकावून बाधित भागात निवडणूक सभा घेत आहेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

कोरोनावर नियंत्रणासाठीच्या उपायांविरोधात अमेरिकेत लाखो लोक उभे ठाकले आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटीचे आरोग्य अधिकारी डाॅ. निकोल क्विक यांना एका बैठकीत जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने त्यांनी १० जून रोजी पदाचा राजीनामा दिला. डॉ. क्विक यांची चूक ही की, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लोकांना मास्क घालणे सक्तीचे केले होते. कोविड- १९ ची प्रकरणे कमी व्हावीत म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. त्यांच्या आदेशाच्या काही तासांतच त्याला विरोध सुरू झाला. काही नाराज स्थानिकांनी त्यांच्याविरोधात फलक लिहिले आणि त्यांची तुलना हिटलरशी केली. काही लोकांनी घोषणा केली की, ते डॉ. क्विक यांच्या समोर मास्क घालून निदर्शने करतील म्हणजे ते आदेश परत घेतील. ऑरेंज काउंटीचे कार्यकारी अधिकारी फ्रँक किम यांनी भास्करला सांगितले की, सार्वजनिक बैठका आणि सोशल मीडियावर सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांना (डॉ. क्विक यांना) संरक्षण देण्यात आले आहे. या भागात १.१७ लाखापेक्षा जास्त लोक या महामारीमुळे मारले गेले आहेत, तर २१ लाखांच्या वर कोरोना पॉझिटिव्ह असतानांही हा विरोध आश्चर्यकारक आहे. कॅलिफोर्नियातीलच सँटा अॅना भागात मास्क समर्थकांची टिंगल करण्यात आली व त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

कॅलिफोर्नियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संघटनेचे कार्यकारी संचालक कॅट डेबुर्क यांनी भास्करला सांगितले की, सर्वसामान्यांमध्ये लसबाबत नाराजी दिसली होती, मात्र नाराजी एवढी वाढेल आणि अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षणात फिरावे लागेल असे कधी कधीच पाहिले गेले नव्हते. सॅन दिएगोमध्ये अधिकाऱ्यांना इशारा द्यावा लागला. कारण अनेक ठिकाणी लोक गर्दीत मास्क न घालता पार्टी करत होते. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीसारखे राज्ये सोडली तर बाकी इतर सर्व राज्यांत लोक ना मास्क घालत आहेत ना आवश्यक अंतर ठेवत आहेत. दक्षिण- पश्चिम मध्य राज्यांत बार आणि रेस्टॉरंट सुरक्षा नियम मानण्यास तयार नाहीत. ही स्थिती शॉपिंग मॉल, थिएटर आणि समुद्रकिनारीही आहे.

लोकांना वाटते: ट्रम्प बेजबाबदार, स्वत: मास्क घालत नाहीत

लोकांचे म्हणणे आहे की, मास्क न घालण्याच्या हलगर्जीमागे अमेरिकेचे बेजबाबदार नेतृत्व आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा आजाराची टिंगल केली आहे आणि ते स्वत:देखील मास्क घातलेले दिसलेले नाहीत. ते बाधित भागांमध्ये मोठ्या सभा करत आहेत. रविवारी ओक्लाहोमाच्या टुल्सा शहरात रॅली झाली. जेथे गेल्या एका आठवड्यात कोरोनाबाधित आणि रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. या सभेत ६० हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले. त्यातील बहुतांश बिनामास्कचे होते. टुल्साच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना ही सभा स्थगित करणे किंवा मोकळ्या जागेत करण्याची विनंती केली होती त्याकडे त्यांच्या टीमने दुर्लक्ष केले.

बातम्या आणखी आहेत...