आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२४ वर्षीय मरियम हसनजादाची आई थांबवत राहिली, पण ती राजधानी काबूलमध्ये रस्त्यावर निदर्शने करणाऱ्या महिलांच्या गर्दीत सामील झाली. महिलांच्या चेहऱ्यावर बुरखा नव्हता. आम्हाला न्याय हवा आणि महिलांवरील अत्याचार थांबवा, अशा घोषणा त्या देत होत्या. तालिबानी बंदूकधाऱ्यांनी धक्काबुक्की करून निदर्शने संपवली. अफगाणिस्तानातील महिलांना डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घालण्याच्या तालिबानच्या आदेशाविरोधात अफगाणिस्तानात निषेधाचे सूर ऐकू येत आहेत. तालिबानच्या इशाऱ्यांनंतरही अनेक निदर्शने झाली.
हसनजादा म्हणतात, आम्ही निषेध केला नाही तर अफगाण महिलांवर किती अत्याचार होत आहेत, हे जगाला कळणार नाही. अफगाण महिलांसाठी हा कठीण काळ आहे. बुरख्यात राहण्यासोबतच महिलांनी अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. काबूलच्या रस्त्यांवर बुरख्याच्या आदेशाचे संमिश्र पालन होते. शिया मुस्लिमबहुल दश्त-ए-बरची जिल्ह्यात फार कमी महिला तोंड झाकतात. तथापि, जवळच्याच कार्टे ना या पश्तून प्रदेशात बहुतेक स्त्रिया डोके झाकणारा हिजाब किंवा स्कार्फ घालतात.
काबूलमधील काही महिलांनी सांगितले की, बुरखा न घालता त्या रस्त्यावर आल्या तर पुरुषांनी त्यांना धमकावतात. राजधानीच्या बाहेर बहुतांश महिला तालिबानच्या आदेशाचे पालन करतात. देशातील अनेक ठिकाणी महिलांनी तालिबानी लढवय्ये त्यांचा पाठलाग करत असल्याचे नोंदवले. ते बुरखा घालण्याचा आग्रह धरतात. तखर प्रांतातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी फरहनाजने सांगितले की, धार्मिक पोलिस चौक्यांवर महिलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा तपासतात. काळा बुरखा न घालणाऱ्या महिलांना घरी परतवले जाते. मजार-ए-शरीफमधील वकील अनिसा मोहंमदी सांगतात की, त्यांनी घाबरून बुरखा खरेदी केला आहे. हेरातमधील ५५ वर्षीय महिला फरहत म्हणतात, “आम्ही बुरखा घालण्यास विरोध करत आहोत.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.