आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर रिसर्च:इटलीत तोंडी, पाकिस्तानात लेखी तर अमेरिकेमध्ये ऑनलाइन परीक्षा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात शाळा-महाविद्यालयीन परीक्षांबाबत काय निर्णय झाले

देशात शाळा सुरू करणे व परीक्षेबाबत चर्चा सुरू आहे. लाख विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. या मुद्द्यावर केंद्र सरकारने राज्यांसाेबत बैठकही घेतली, मात्र कोरोनाची स्थिती आणि राज्यांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. जगाबाबत बोलायचे तर अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी गेल्या वर्षी परीक्षा रद्द केल्या होत्या, मात्र यंदा नवीन पर्याय शोधले आहेत. यात ऑनलाइन, श्रेणी पद्धत, मूल्यांकन आणि परीक्षा पुढे ढकलण्यासारखे निर्णय आहेत.

बहुतांश देशांत ऑनलाइन परीक्षांवर भर, चाचण्याही केल्या रद्द
गेल्या वर्षी ब्रिटन, फ्रान्स, इटली, आयर्लंड, नाॅर्वे, स्वित्झर्लंडसारख्या अनेक देशांनी शाळांच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या होत्या. डेन्मार्क, इस्रायल, ऑस्ट्रियाने परीक्षा घेतल्या होत्या. या वर्षाचे सांगायचे तर अमेरिकेत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय आहेत. इटली आणि फ्रान्समध्ये जूनमध्ये परीक्षा होईल. यात इटलीत फक्त तोंडी परीक्षा होईल. आपला शेजारी पाकिस्तान लेखी परीक्षा घेणार आहे. या वेळी ती मेमध्ये होणार होती. मात्र कोरोनामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल.

ब्रिटन
अल्गोरिदम सिस्टिमवर वाद झाल्याने मूल्यांकन लागू केले. यात चाचणी, तोंडी परीक्षेतील कामगिरीवर मूल्यांकन होईल. यंदाही तेच होईल.
पाकिस्तान
गेल्या वर्षी सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदा मेऐवजी नोव्हेंबरमध्ये होतील. १०वी-१२वीच्या परीक्षा जुलैत होणार होती. अभ्यासक्रम २५% कमी केला.
जपान
गेल्या जानेवारीत परीक्षा घेतली. ५.३० लाख विद्यार्थी सहभागी. आजारी मुलाला दुसरी संधी मिळेल.
नेदरलँड्स
शाळा, विद्यापीठातील शिक्षण बहिःस्थ पद्धतीने होत आहे. मात्र, सराव प्रशिक्षण आणि परीक्षेसाठी अटींसह पर्याय देण्यात आले आहेत.
चीन
गेल्या जुलैत १.०७ कोटी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यंदा प्रोटोकॉलसह लेखी परीक्षा होईल.
स्पेन
कोर्स, प्रश्न सोपे केले. विद्यापीठात ५पैकी ३ च प्रश्न द्यायचे होते. लॉकडाऊनमध्ये शिकवलेल्या कोर्सबाहेरचे प्रश्न नव्हते. यंदा परीक्षेवर निर्णय नाही.
ऑस्ट्रेलिया
गेल्या वेळेसारखीच लेखी व निश्चित वेळी परीक्षा होईल. ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शक्य.
जर्मनी
यंदा अटींसह परीक्षा होईल. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या तुलनेत सोप्या अभ्यासक्रमाचा समावेश. परीक्षा व गुणांचा फॉरमॅटही सोपा केला.

इटली
५०% क्षमतेने शाळा सुरू. अंतिम परीक्षा जूनमध्ये. फक्त तोंडी होईल. सेकंडरी शाळा आणि परीक्षांसाठी सुमारे २६५ कोटी रु.चे बजेट.
फ्रान्स
२०२० मध्ये परीक्षा रद्द केल्या होत्या. मूल्यांकन आणि कोर्स वर्कच्या आधारे विद्यार्थ्यांना श्रेणी दिली. परीक्षा जूनमध्ये होईल, तीही फक्त विशेष विषयांची.
अमेरिका
८८% मुले ऑनलाइन शिकताहेत. यंदा परीक्षेत १००% अभ्यासक्रम असेल. ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षा. लॉस एंजलिस परीक्षा घेणार नाही.

बातम्या आणखी आहेत...