आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियात आदेश:विदेशी चित्रपट पाहिला, फाटकी जीन्स घातल्यास मृत्यू; मुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना

सोलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • किम जोंग उन विदेशी हेअरस्टाइल, कपड्यांना म्हणतात खतरनाक विष

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी नवा आदेश काढला आहे. त्यानुसार विदेशी चित्रपट पाहणे आणि विदेशी कपडे घातल्यास मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल. तसेच एखाद्याजवळ अमेरिकी, जपानी किंवा दक्षिण कोरियाचे व्हिडिओ आढळले तर त्यालाही मृत्युदंड दिला जाईल.

किम जोंग उन यांनी नुकतेच सरकारी माध्यमांना एक पत्र लिहिले आहे. यात देशातील तरुणांना आवाहन करण्यात आले आहे की, तरुणांमधील अप्रिय, व्यक्तिवादी, समाजविरोधी वर्तनाविरोधात मोहीम राबवा. याबाबत शेजारी देश दक्षिण कोरियाचे नागरिक सांगतात की, हुकूमशहा विदेशी भाषणे, हेअरस्टाइल आणि कपड्यांना धोकादायक विष समजतात. डेली एनकेच्या नुसार, त्यांच्या नागरिकांनी दक्षिण कोरियाच्या चांगल्या टीव्ही मालिका, चित्रपट बघू नये असे हुकूमशहाला वाटते. तरुणांमध्ये भीती निर्माण करून त्यांच्या इच्छा मारायच्या आहेत. एखाद्या दुसऱ्या देशाची संस्कृती उत्तर कोरियात आली तर तेथील तरुण त्यांच्या विरोधात उभे राहतील, हुकूमशाहीचा विरोध करतील, असे त्यांना वाटते. यामुळे हा कायदा लागू केला आहे. त्यानुसार कर्मचारी दोषी आढळल्यास कारखाना प्रमुखाला शिक्षा होईल. मुलाने विदेशी कपडे घातले किंवा विदेशी हेअरस्टाइल केली तर त्याच्या आई-वडिलांना शिक्षा केली जाईल.

बाहेरचे जग कसे दिसते, हे बघायचे आहे लोकांना
डेली एनकेनुसार उत्तर कोरियाच्या लोकांना बाहेरच जग कसे दिसते हे बघायचे आहे. तेथे काय सुरू आहे. उत्तर कोरियातून पळालेले लोक सांगतात की, आधी त्यांना वाटायचे की पश्चिमेतील लोक त्यांच्या देशाबाबत खोटे बोलतात. गेल्या वर्षी उत्तर कोरियातून पळून जाण्यात यशस्वी झालेले चोई जोंग-हून सांगतात, मी चीनमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा इंटरनेट वापरले. मी उत्तर कोरियावरील अनेक वृत्तचित्रे पाहिली, लेख वाचले आणि तेव्हा जाणीव झाली की हे सत्य आहे. कारण त्यांचे म्हणणे समजत होते. आणि हे समजण्यात उशीर झाला होता. त्यानंतर मी परत येऊ शकलो नाही. आता मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण होते.

बातम्या आणखी आहेत...