आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लादेन कुत्र्यांवर करत होता रासायनिक शस्त्रांची टेस्टिंग:मुलगा उमर म्हणाला - माझ्या डोळ्यापुढे सुरू होते एक्सपेरिमेंट

दोहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल कायदा या कुख्यात अतिरेकी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आपल्या पाळीव कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांची टेस्टिंग करत होता. हा खळबळजनक खुलासा त्याचा मुलगा उमरने एका मुलाखतीत केला आहे. या प्रकरणी उमरने आपण स्वतःच व्हिक्टिम असल्याचा दावा केला आहे.

ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'च्या वृत्तानुसार, कतारला आलेला लादेनचा सर्वात मोठा मुलगा म्हणाला - माझ्या वडिलांची मी त्यांच्या मार्गाने वाटचाल करावी अशी इच्छा होती. पण माझी तशी इच्छा नव्हती. अफगाणिस्तानात असताना ते मला शस्त्र चालवण्याची ट्रेनिंग देत होते. त्यांनी आमच्या पाळीव कुत्र्यांवर रासायनिक शस्त्राची टेस्टिंगही केली होती.

हे छायाचित्र ओसामा व त्याचा मुलगा उमरचे आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, उमरचा आपले वडील ओसामा बिन लादेनसोबत अत्यंत वाईट काळ गेला. त्याला हा काळ विसरायचा आहे.
हे छायाचित्र ओसामा व त्याचा मुलगा उमरचे आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, उमरचा आपले वडील ओसामा बिन लादेनसोबत अत्यंत वाईट काळ गेला. त्याला हा काळ विसरायचा आहे.

वाचा ओसामा बिन लादेनचा मुलगा उमरची मुलाखत

"वडिलांच्या कारवायांचे दुःख"

प्राण्यांवर होणाऱ्या केमिकल वेपनच्या चाचणींवर भाष्य करताना उमर म्हणाला - मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. माझ्या पाळीव कुत्र्यांवरही केमिकल वेपनची टेस्टिंग करण्यात आली. मला हे आवडले नहाी. मी यामुळे खूप दुःखी झालो. माझ्यासाठी हे पाहणे खूप अवघड होते. मला आता या कटू आठवणी विसरायच्या आहेत.

उमरने पाळीव कुत्र्यांवरील हा प्रयोग पाहिला तेव्हा तो खूप छोटा होता. लादेनने त्याला एके-47 रायफल व रशियन रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण दिले.
उमरने पाळीव कुत्र्यांवरील हा प्रयोग पाहिला तेव्हा तो खूप छोटा होता. लादेनने त्याला एके-47 रायफल व रशियन रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण दिले.

"दहशतवादाचा मार्ग सोडल्यामुळे लादेन झाला होता नाराज"

41 वर्षीय उमर सध्या आपली पत्नी जैनासोबत फ्रान्सच्या नॉरमँडीमध्ये राहतो. सध्या तो कतारच्या दौऱ्यावर आहे. त्यात एका मुलाखतीत तो म्हणाला - आम्ही 4 भाऊ आहोत. माझी अतिरेकी जगात रमण्याची इच्छा नव्हती. मी वडील लादेनला गुडबाय म्हटले. यामुळे ते नाराज झाले. त्यांनी मला कधीही थेटपणे अल कायदात येण्याचे सांगितले नाही. पण मी त्यांचा उत्तराधिकारी असल्याचे ते अनेकदा म्हणत होते.

उमरने अमेरिकेवरील 11 सप्टेंबर 2001 च्या अतिरेकी हल्ल्यापूर्वी काही महिने अगोदर एप्रिल 2001मध्ये अफगाणिस्तान सोडले होते.
उमरने अमेरिकेवरील 11 सप्टेंबर 2001 च्या अतिरेकी हल्ल्यापूर्वी काही महिने अगोदर एप्रिल 2001मध्ये अफगाणिस्तान सोडले होते.

पत्नी म्हणाली - अत्यंत तणावात राहतात उमर, पॅनिक अटॅकही येतात

उमरची पत्नी जैना म्हणाली - उमरचे बालपण अत्यंत अंधारात गेले. तो आजही त्या धक्क्यातून सावरला नाही. तो अत्यंत तणावात राहतो. त्यांना कधीकधी पॅनिक अटॅकही येतात. आपल्या वडिलांनी वाईट कृत्य केल्यावर त्याचा विश्वास बसत नाही. त्यांनी अत्यंत लहान वयात शस्त्रांचे प्रशिक्षण घेतल्याने व आपल्या पेट्सवर चाचणी होताना पाहिल्यामुळे ते आपले बालपण आठवणे टाळतात.

हे छायाचित्र उमर व त्यांची पत्नी जैनाची आहे. उमर एक पेंटर आहे. त्यांची पेंटिंग 8500 म्हणजे 8 कोटींहून अधिक किंमतींना विकते.
हे छायाचित्र उमर व त्यांची पत्नी जैनाची आहे. उमर एक पेंटर आहे. त्यांची पेंटिंग 8500 म्हणजे 8 कोटींहून अधिक किंमतींना विकते.

लादेनवर 9/11 हल्ल्याचा आरोप

11 सप्टेंबर 2001 रोजी 19 अतिरेक्यांनी 4 प्रवाशी विमानांचे अपहरण करून अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटवर धडकवले. या हल्ल्याला 9/11 हल्ला म्हणून ओळखले जाते. या हल्ल्यात 93 देशांतील 2 हजार 977 हून अधिक जण मारले गेले होते.

अमेरिकेने केला होता खात्मा

अमेरिकेच्या नेव्ही सील्स कमांडोंनी लादेनची पाकिस्तानातील एका घरात शिरून हत्या केल्याची माहिती उमर यांना 2 मे 2011 रोजी कतारमध्ये मिळाली होती. त्यानंतर अमेरिकन नौदलाने लादेनचा मृतदेह 24 तासांच्या आत सुपरकॅरियर USS कार्ल विंसनच्या मदतीने समुद्रात दफन केला होता. उमर म्हणतो - त्यांनी माझ्या वडिलांच्या मृतदेहासोबत काय केले हे मला माहिती नाही. ते समुद्रात फेकल्याचा दावा करतात. पण माझा त्यावर विश्वास नाही.

बातम्या आणखी आहेत...