आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्राझीलच्या अॅमेझॉन भागात ६० आदिवासी समुदायांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. येथे आतापर्यंत ९८० रुग्ण आढळून आले असून १२५ जणांचा मृत्यू झाला. अॅमेझॉन क्षेत्रात आरोग्याच्या पायाभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागात संसर्ग वेगाने वाढू शकतो. अॅमेझॉनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा दर १२.६ टक्के आहे. राष्ट्रीय दर ६.४ टक्के आहे. ब्राझीलमध्ये विविध समुदायांचे ९ लाखांवर लोक आहेत. ते घनदाट जंगलाने वेढलेल्या गावांमध्ये राहतात. एप्रिलमध्ये आदिवासी भागातील एका व्यक्तीचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला होता. तो १५ वर्षांचा रुग्ण होता. वास्तविक आदिवासी लोक बाहेरील लोकांना गावात प्रवेश करू देत नाहीत. मग कोरोनाचा प्रादुर्भाव कसा वाढला हा प्रश्न सरकारसमोर आहे. ९० टक्के समुदायांचे वास्तव्य असलेली गावे आयसीयू रुग्णालयापासून किमान ३१५ किमी अंतरावर आहेत. १० टक्के समुदायाची गावे अशा रुग्णालयांपासून किमान ७०० ते ११०० किमी लांब आहेत. येथील रुग्णांना गरज भासल्यास आधीस नौकेने व नंतर विमानाने रुग्णालयात न्यावे लागते. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ११३ बाधित आहेत. २२ हजार १६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.