आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Over 39 Lakh Women Are Taking Online Courses, The First Choice Of Indian Youth For Various Subjects Like Computer Programming

वॉशिंग्टन:कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि मशीन लर्निंगसारख्या वेगळ्या विषयांना भारतीय तरुणींची पहिली पसंती, 39 लाखांवर महिला करताहेत ऑनलाइन कोर्स

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन शिक्षण व अभ्यासक्रमात भारतीय तरुणींची संख्या महामारीपूर्वीपेक्षाही जास्त झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांना या युवतींची पहिली पसंती आहे. मिशिगन विद्यापीठाच्या ‘प्रोग्रामिंग फॉर एव्हरीबडी’ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ‘मशीन लर्निंग कोर्स’ला भारतीय युवतींनी सर्वाधिक पसंती दिली आहे. ३९ लाखांपेक्षा जास्त महिलांनी हा अभ्यासक्रम निवडला आहे. म्हणजे ‘कोर्सेरा’वर नोंदणी झालेल्या एकूण भारतीय युवतींत सुमारे ५०% नी हा अभ्यासक्रम निवडला आहे.

‘कोर्सेरा’ या अमेरिकी ऑनलाइन कोर्स प्रोव्हायडरने ‘वुमन अँड स्किल’ अहवालात हा दावा केला आहे. अहवालानुसार, या लर्निंग प्लॅटफॉर्मवर १.२ कोटी भारतीय युजर्सनी नामांकन केले आहे. त्यात ४८ लाख युवती आहेत. देशाच्या आयटी क्षेत्रात वेतन खूप वाढत आहे आणि महामारीनंतर डिजिटल कौशल्याच्या अनेक संधी मिळत आहेत. अशा काळात तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत महिलांचा रस वाढला आहे. महिलांच्या पाच आवडीच्या अव्वल कौशल्यांपैकी चार स्टेम कोर्स (सायन्स, टेक, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स) आहेत. त्यात कॉम्प्युटर प्रोग्रामिंग (२० लाख भारतीय महिला), मशीन लर्निंगमध्ये (१९ लाख) सर्वाधिक महिला आहेत. प्रॉबेबलिटी आणि स्टॅटिस्टिक्स, थिओरिटिकल काॅम्युटर सायन्स आणि कम्युनिकेशन्स यांसारख्या विषयांतही त्यांनी विशेष रस दाखवला आहे. कोर्सेराच्या चीफ कंटेंट ऑफिसर बेट्‌टी वँडेनबोश यांच्यानुसार, कामगार बाजारपेठेत जटिल परिस्थिती असूनही भारतीय महिला नवे डिजिटल कौशल्य शिकत आहेत आणि वर्कफोर्ससाठी त्या तयारी करत आहेत, हे उत्साहजनक आहे.

१४% वाढल्या महिला सहभागी, ६२% मोबाइलने ऑनलाइन कोर्स करताहेत
अहवालानुसार, कोर्सेरावर १९० देशांचे सहभागी आहेत. त्यात ४८ लाख भारतीय महिला असून त्या दुसऱ्या स्थानी आहेत. पहिल्या स्थानी अमेरिका (८६ लाख महिला) आहे. प्लॅटफॉर्मवर भारताच्या एकूण सहभागी पाहिल्यास ३८% महिला आहेत, २०१४ मध्ये त्या फक्त २४% होत्या. स्टेम कोर्समध्येही महिलांची संख्या गेल्या दोन वर्षांत २३% वरून वाढून ३२% वर पोहोचली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ६२% महिला मोबाइलद्वारे ऑनलाइन कोर्स करत आहेत. जागतिक स्तरावर ही संख्या फक्त ४८% आहे. कोर्स करणाऱ्या भारतीयांचे सरासरी वय २७ वर्षे आहे, तर जागतिक सहभागींचे सरासरी वय ३१ वर्षे आहे. कोर्सेरावर ५००० कोर्स आहेत, त्यात जगभरातील ८.७ कोटी सहभागी आहेत.

बातम्या आणखी आहेत...