आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हॅक्सीन:अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्डच्या लसीमुळे एका स्वयंसेवकाचा मृत्यू; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये याच कंपनीच्या लसीचे उत्पादन सुरू

साओ पाउलो2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वृत्तानंतर अॅस्ट्राझेनेकाच्या शेअरमध्ये 1.7% ची घसरण झाली.

कोरोना काळात लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सुखद वृत्त येत असतानाच ब्राझीलने धक्का दिला आहे. अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीदरम्यान ब्राझीलच्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे, असे तेथील आरोग्य विभागातर्फे बुधवारी सांगण्यात आले. मात्र, ही व्यक्ती कुठे राहते, हे गुप्त ठेवले आहे. लसीची चाचणी सुरूच राहील, असे ब्राझीलच्या आरोग्य प्राधिकरणाने म्हटले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये याच कंपनीच्या लसीचे उत्पादन सुरू आहे.

या वृत्तानंतर अॅस्ट्राझेनेकाच्या शेअरमध्ये १.७% ची घसरण झाली. लस तयार करण्याच्या स्पर्धेत अग्रभागी असलेल्या या कंपनीकडे भारतासह अवघ्या जगाचे लक्ष लागलेले आहे.

कोव्हिरॅप : ५०० रुपयांत होणार कोरोनाची तपासणी

नवी दिल्ली | आयआयटी खरगपूरने विकसित केलेल्या कोरोना तपासणी उपकरणाला आयसीएमआरने हिरवी झेंडी दाखवली. या यंत्रामुळे अवघ्या ५०० रुपयांत कोरोनाची तपासणी करून तासाभरात अहवालही हाती येईल. या यंत्राची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

बातम्या आणखी आहेत...