आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भारतात पॅकेज्ड फूडमध्ये जास्त साखर-स्वीटनर आढळते; अमेरिकेत आरोग्यदायक उत्पादने

वाॅशिंग्टन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत, चीनसारख्या देशांत पाकीटबंद अन्नपदार्थ आणि पेयांत साखर आणि स्वीटनरचा(उदा.सॅक्रिन आदी) वापर वाढत असून ते चिंतानजक आहे. २००७ ते २०१९ दरम्यान पॅकेज्ड फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखर आणि स्वीटनरच्या वापराबाबत ही माहिती समोर आली आहे. ऑनलाइन विज्ञान मासिक अलर्टनुसार, जगातील एकूण प्रतिव्यक्ती स्वीटनरचा वापर आता ३६% वाढला आहे. पाकीटबंद पदार्थात साखर ९% वाढली आहे. स्वीटनरचा वापर आइस्क्रीम, बिस्किटसारख्या पदार्थांत बहुतांश केला जातो. पेय गोड करण्यासाठी साखरेचा वापर भारत, चीनसारख्या देशांत ५०% वाढला आहे. दुसरीकडे, श्रीमंत देश अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात हा कमी झाला आहे. अभ्यासात दिसले की, निर्माते अन्नसामग्रीत साखर आणि स्वीटनरच्या बाबतीत दुहेरी मानदंड अंगीकारत आहेत.

साखर आणि स्वीटनरच्या कमी प्रमाणाच्या आरोग्यदायक उत्पादनाचा पुरवठा श्रीमंत देशांत केला जात आहे. अन्य देशांत जास्त साखर आणि स्वीटनरच्या उत्पादनांचा पुरवठा केला जात आहे. ते टाळण्यासाठी अनेक देशांची सरकारे आता साखरेच्या प्रमाणावरून निर्बंध लावत आहेत. लेबलिंगवर लक्ष देऊन दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली जात आहे. सरकारच्या कठोर भूमिकेनंतर साखरेऐवजी स्वीटनरचा वापर करू लागले आहेत. स्वीटनरमध्ये खूप कमी किंवा अजिबात उष्मांक असत नाही. हे साखरेपासून किंवा नैसर्गिक वा कृत्रिम पद्धतीने तयार होऊ शकतात. कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंकमध्ये साखरेऐवजी स्वीटनरचा वापर वेगाने वाढला आहे. कमी उष्मांकाच्या स्वीटनर वापराच्या नावाखाली उत्पादक ही उत्पादने आरोग्यदायी असल्याचा दावा करतात. मात्र, साखरेऐवजी स्वीटनरच्या वापरात धोका कमी नसतो.स्वीटरन साखरेपेक्षा खूप जास्त धोकादायक असल्याचे मॅनिटोबा विद्यापीठातील संशोधनात आढळून आले आहे.

शुगर फ्रीच्या दाव्यावर जाऊ नका, जास्त प्रमाण घेतल्यास नुकसान होते
बाजारात अनेक प्रकारची शुगर फ्री उत्पादने आहेत. त्यात साखर नसते आणि मधुमेह रुग्णही सेवन करू शकतो,असा दावा केला जातो. मधुमेहाचे रुग्ण चहा, कॉफी आ‍दीत या गोळ्यांचा वापर करतात. मात्र, त्याचे साइड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे जास्त प्रमाणात त्याचा वापर टाळावा, असा सल्ला दिला जातो. मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या संशोधनानुसार, शुगर फ्री वजन कमी करण्यात अजिबात मदत करत नाही. त्याच्या जास्त सेवनाने हृदयाच्या आजारांसह अन्य रोगांचा धोका आहे. डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...